मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेलाय, ह्याच्या***, माझ्या नादी लावू नको; शहाजीबापूंची धैर्यशील मोहिते पाटलांवर चौफेर टीका
Solapur Lok Sabha Election 2024 : शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्यावर चौफेर टीका केली आहे.
सोलापूर : माझ्या नादी लावू नका, नको त्या भानगडीत पडू नको, आतापर्यंत खूप जीभ आवरलीय, असं म्हणत शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्यावर चौफेर टीका केली आहे. तुम्हाला रक्ताची शपथ आहे, आता मैदानात सापडलंय त्याला सोडायचं नाही, असं म्हणत शहाजी बापूंनी मोहित पाटलांवर टीका केला आहे. सांगोल्यातील महायुतीच्या प्रचारसभेत शहाजी बापू पाटलांनी चौफेर फटकेबाजी केली.
मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेलाय
रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि शहाजी बापू पाटलांनी तुमच्यासाठी काही केलं असेल, तर प्रत्येकाने कमळाचं बटण दाबा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या घरी देवांचा देव महादेव आणून सोडला, तर तीन तासात त्यांचा राक्षस होईल. माझ्या नादी लावू नका, नको त्या भानगडीत पडू नको, आतापर्यंत खूप जीभ आवरलीय. जाऊद्या लेकरू आहे, राजसिंग दादाचं म्हणून बोलायला नको, असं शहाजी बापूंनी म्हटलं आहे. मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेलाय, ह्याच्या***, डोक्यातून हलता हलत नाही, असं म्हणत शहाजी बापूंनी निशाणा साधला आहे.
शहाजी पाटलांची शरद पवारांवर टीका
कर्ज घ्यायला हे मोहिते पाटील तुमच्याकडे आले. फडणवीस साहेब तुम्ही यांना खारीक, बदाम खाऊ घालून सुद्धा यांनी तुमच्या विरोधात दंड थोपटले. मोहिते पाटलांनी डीसीसी बँकेतून 1400 कोटी कर्ज घेतले आणि बुडवले. माझा सख्खा भाऊ मेल्यावर पण लगेच आठ सभा केल्या एवढं प्रामाणिक राहिलो, इतकी प्रामणिक श्रद्धा मी शरद पवारांवर ठेवली पण काय दिलं आपल्याला? शरद पवार मला म्हणायचे, शहाजी बापू यावेळी तुम्ही निवडून येताय, असे रिपोर्ट आलेत, असे पवार म्हणायचे आणि मागे वेगळे बोलायचे. शरद पवारांनी दिलेला शब्द खरा ठरलाय, असे दाखवायचे आणि मी राजकारण सोडायचं.
मोहिते पाटलांनी तालुका उध्वस्त करून टाकला
शहाजी बापू पाटील म्हणाले, ही निवडणुकीची सभा आहे, पण सोबतच ऋण फेडण्याची सभा आहे. तालुक्याला आलेलं प्रत्येक थेंब भाजप आणि शिवसेनामुळेच आलं. मोहिते पाटलांनी तालुका उध्वस्त करून टाकला, लोकं नावं घ्यायला घाबरत असतील, मी उघडपणे सांगतो. उजनी, टेम्बू आणि म्हैसाळ या सर्व योजनेतून पाणी फडणवीस यांनी दिलेलं आहे. कुठल्याही पिकाला पाणी कमी पडणार नाही, याची हमी देणारा नेतृत्व म्हणजे फडणवीस असंही त्यांनी म्हटलं आहे.
मी घासून निसटलो नायतर अडकलोच असतो
देशाचे नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचे हे ठरवणारी ही निवडणूक. गुवाहाटी कशाला गेला म्हणून माझ्यावर टीका होतेय, मला तरी कळलं का गेलो. एवढं करून बी कमी मताने निवडून आलो, मी घासून निसटलो नायतर अडकलोच असतो. बायकोची शपथ घेऊन सांगतो, गणपतरावांना पडायचं नव्हतं, तालुक्याला पाणी आणि विकास आणायचं होतं, म्हणून निवडणूक लढवली, असंही शहाजी बापूंनी सांगितलं आहे.
...म्हणून आम्ही गुवाहाटीला गेलो
गद्दारी आम्ही केली नाही, उद्धव साहेब तुम्हीच गद्दारी केली. तुम्ही कुठंच उभं नव्हता, आम्ही पळपळ पळालो. आमची इच्छा होती उद्धव साहेब, देवेंद्र साहेब मुख्यमंत्री व्हावे. माझ्या मनात सल होती की, ज्याच्यामुळे निवडून आलो, त्याच्या पाठीत खंजीर खुपसलं म्हणून जसं मांजर मारल्यावर काशीला जातात, तसं आम्ही गुवाहाटीला गेलो.
पाहा व्हिडीओ : शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले ? पाहा भाषण
महत्त्वाच्या इतर बातम्या :