(Source: Poll of Polls)
शहाजी बापू पाटलांचा लोचा झाला रे! रणजितसिंह नाईक निंबाळकरांऐवजी रणजीतसिंह मोहिते पाटलांना मतदान करण्याचं आवाहन
Solapur Mahayuti Sabha : शहाजी बापू पाटलांनी सांगोलेकरांना रणजितसिंह नाईक निंबाळकरांऐवजी रणजीतसिंह मोहिते पाटलांना मतदान करण्याचं आवाहन केलं. चूक लक्षात येताच त्यांनी ती दुरुस्तही केली.
सोलापूर : सांगोल्यामध्ये रविवारी महायुतीची (Mahayuti) जोरदार प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती, यासभेत सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी जोरदार फटकेबाजी केली. मात्र, त्यांनी जोशाच्या भरात त्यांनी रणजीतसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. शेजारी उभ्या असलेल्या कार्यकर्त्याने ही चूक निदर्शनास आणून दिल्यावर शहाजी पाटलांनी चूक सुधारत महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
रणजीतसिंह मोहिते पाटलांना मतदान करण्याचं आवाहन
आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून रणजीतसिंह मोहिते पाटलांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलं. पण, चूक लक्षात येताच शहाजी बापू पाटलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करण्याचं नागरिकांना आवाहन केलं.
धैर्यशील मोहिते पाटलांना शहाजी पाटलांचा इशारा
यासभेत शहाजी बापू पाटलांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शहाजी बापू पाटील म्हणाले, लगा धैर्यशील मोहित्या, तुझ्या घरात महादेव आणून सोडला तर, तीन तासात तो राक्षस होऊन बाहेर पडेल. धैर्यशील मोहिते माझ्या नादाला लागू नका, मी माझ्या मुसक्या आवळून ठेवल्या आहेत, अशा शब्दात शहाजी पाटलांनी धैर्यशील मोहिते पाटलांना इशारा दिला आहे.
...तर माझ्याकडे पाणी मागायला यायचं नाही
सांगोला वासियांनो जर मोहिते पाटील निवडून आला तर, पुन्हा माझ्याकडे आणि दीपक आबाकडे पाणी मागायला यायचं नाही. जमिनीत पाणी आलं तर पिक आलं, पिक आहे तर पैसा आला, पैसा आला तर घर चालतील, असं म्हणत सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी सांगोलेकरांना जणू धमकीचं दिली आहे.
पाहा व्हिडीओ : काय म्हणाले शहाजी बापू पाटील?
महत्त्वाच्या इतर बातम्या :
एकनाथ शिंदेंना मारण्याचा उद्धव ठाकरेंचा कट, शिवसेना प्रवक्त्याचा गंभीर आरोप