Pyre: उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
या फेस्टीवलसाठी भारताकडून या सिनेमाचा समावेश केला गेलाय. फिल्ममेकर विनोद कापडी यांच्या प्यारे या चित्रपटाची सिनेवर्तुळात सध्या मोठी चर्चा आहे.
Pyre movie: चित्रपटांच्या विश्वात काही चित्रपट असे असतात जे बॉक्सऑफीसवर दणदणीत चालतात. काही फिल्मफेस्टीवलमध्ये जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतात. अशाच काही फिल्म्स जगभरातले लोक नावाजतात ते त्याच्या कथेमुळे, दिग्दर्शनामुळे आणि त्या सिनेमाच्या Vibe मुळे. अशाच एका कथेची सध्या मोठी चर्चा आहे. अर्थातच हा चित्रपट भारतीय आहे. उत्तराखंडमधल्या एका भुताटकी गावातल्या जख्ख वृद्धांची एक अनोखी प्रेमकहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
सध्या एस्टोनियाची राजधानी टालिन येथे ब्लॅक नाईट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल होतोय. या फेस्टीवलसाठी भारताकडून या सिनेमाचा समावेश केला गेलाय. फिल्ममेकर विनोद कापडी यांच्या प्यारे या चित्रपटाची सिनेवर्तुळात सध्या मोठी चर्चा आहे.कायम नव्या कथांच्या शोधात असणारे विनोद कापडी यांच्या या फिल्मला अनेकजण जमिन आणि आकाशाचं प्रेमपत्र म्हणतायत तर काही जणांना हा विषयच एवढा नवीन आहे की या कल्पनेचंच कित्येकांना अप्रूप वाटतंय.हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या उत्तराखंडमध्ये एका भुताटकी गावात जिथे मैलोन मैल साधा रस्तासुद्धा जात नाही अशा भागात 80 वर्षांच्या या जोडप्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
मृत्यूकडे डोळा लावून बसलेले वृद्ध प्रेमी
विनोद कापडी हे कायम नव्या नव्या कथांच्या आणि भन्नाट गोष्टींच्या शोधात असणारे फिल्ममेकर म्हणून ओळखले जातात. अनेक काळ या कथेवर ते काम करतायत. उत्तराखंडमधून अनेकवेळा होत असलेलं लोकांचं पलायन ज्यामुळं हे गाव निर्मनुष्य बनत जाणारं. या गावातील एका माणसाला विनोद भेटले होते. मृत्यूच्या वाटेकडे डोळे लावून बसणाऱ्या वृद्ध जीवांमधलं प्रेम या विषयानं विनोद यांच्या मनावर खोलवर ठसा उमटवला आणि याच कथेवर त्यांनी सिनेमा करण्याचं ठरवलं.
गुलजारांनी या सिनेमाला गाणं दिलंय
हिंदी उर्दूमधील विलक्षण गीतकार गुलजार यांनी प्यारे या चित्रपटासाठी गाणं दिलं आहे. विनोद यांनी सांगितलं की गुलजारांनी या गाण्यासाठी कोणतीही रक्कम घेतली नाही. ते म्हणाले, सत्यजीत रे यांच्या सिनेमांची परंपरा या सिनेमात दिसत आहे.
विनोद कापडी यांची निर्मिती, पैट्रिशिया रॉमेल यांचं एडिट
विनोद कापडी हे अनेक दर्जेदार आणि उत्कृष्ट कथा आणि फिल्ममेकर म्हणून ओळखले जातात. यांनी प्यारे या चित्रपटाचं दिग्दर्शन पॅट्रिशिया रॉमेल या प्रतिभाशाली महिला फिल्म एडिटरनं केलंय. यांचं एडिटिंग म्हणजे शॅाट्स, ध्वनी आणि संगीत आणि विचारांचं एक मनोहर दृश्य. द लाइफ ऑफ अदर्स या फिल्मलाही यांनीच एडिट केलं आहे. ज्याला २००६ मध्ये सर्वश्रेष्ठ अंतरराष्ट्रीय फिल्मम्हणून ऑस्कर मिळाला होता.