एक्स्प्लोर

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभेला दक्षिण अन् उत्तर भारतीय पोहचले; भाषण संपताच काय म्हणाले?, VIDEO

Raj Thackeray: महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे, असंही राज ठाकरेंनी ठणकावले. दरम्यान, राज ठाकरेंच्या या विधानावर गुजराती, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray: मीरा रोडमधील सभेत हिंदीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट आव्हान दिलं आहे. हिंदीसक्ती लागू करून दाखवाच...दुकानंच नाही तर शाळाही बंद करणार, असं राज ठाकरे म्हणाले. तर, भाजप खासदार निशिकांत दुबेंचाही (Nishikant Dubey) राज ठाकरेंनी समाचार घेतला. मुंबईत ये, समुद्रात डुबे डुबे के मारेंगे, असं म्हणत राज ठाकरेंनी दुबेंना प्रतिआव्हान दिलं. यासह मराठी येत नसेस तर कानाखाली बसणारच, असं म्हणत राज ठाकरेंनी मराठीद्वेष्ट्यांनाही थेट इशारा दिला आहे.

मीरा रोडमध्ये काल (18 जुलै) राज ठाकरेंनी आक्रमक भाषण केलं. हिंदी ही कुणाचीही मातृभाषा नाही. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधील अनेक मातृभाषांसह 250 भाषा हिंदीने मारल्या. अगदी हनुमान चालिसासुद्धा अवधी भाषेत आहे, हिंदी नव्हे. तिथल्या लोकांना उलट ही गोष्ट सगळ्यात आधी समजायला हवी, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे, असंही राज ठाकरेंनी ठणकावले. दरम्यान, राज ठाकरेंच्या या विधानावर गुजराती, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना दक्षिण-उत्तर भारतीय नेमकं काय म्हणाले, पाहा...

दक्षिण अन् उत्तर भारतीय काय म्हणाले?

महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलीच पाहिजे, असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. राज ठाकरेंच्या या सभेला गुजराती पदाधिकाऱ्यांपासून ते दक्षिण भारतीय उत्तर भारतीय देखील उपस्थित होते. माझी जन्मभूमी-कर्मभूमी महाराष्ट्रात आहे, त्यामुळे मराठी शिकलीच पाहिजे, असं एक गुजराती पदाधिकारी म्हणाला. तसेच जो कोणी मराठीविरुद्ध बोलेल, त्याला आम्ही कानाखाली मारणारचं, असा इशारा देखील या गुजराती पदाधिकाऱ्याने दिला. तसेच उत्तर भारतीय असलेल्या मेहबुब अली सय्यद नावाचा व्यक्ती म्हणाला की, मलाही थोडं थोडं मराठी येतं, मी देखील मराठी शिकतोय...महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायलाचं हवं. राज ठाकरे म्हणताय, ते अगदी बरोबर आहे, असंही मेहबुब अली सय्यद म्हणाले. 

तामिळनाडूमधील नागरिक काय म्हणाला?

राज ठाकरेंच्या सभेला उपस्थित असणारा तामिळनाडूमधील व्यक्ती म्हणाला की, आमच्या तामिळनाडूमध्ये गेलात की तेथील लोक नेहमी तामिळ भाषेतच बोलतात, कधीही हिंदीत बोलत नाही. महाराष्ट्र माझं कर्मभूमी आहे. महाराष्ट्राने मला खूप काही दिलं, त्यामुळे मी मराठी विसरणार का?, महाराष्ट्रात मराठी बोललीच पाहिजे, असं तामिळनाडूमधील सदर नागरिक म्हणाला. 

संबंधित बातमी:

Nishikant Dubey On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे; निशिकांत दुबेंची पहिली प्रतिक्रिया

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Gold Silver Rate : चांदीच्या दराची 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल, सोनं 1973 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
चांदीच्या दराची 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल, सोनं 1973 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
Video: कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
Video: नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले
Video: नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Gold Silver Rate : चांदीच्या दराची 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल, सोनं 1973 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
चांदीच्या दराची 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल, सोनं 1973 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
Video: कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
Video: नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले
Video: नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
Census 2027 : देशभरात 2027 मध्ये जनगणना होणार, केंद्राचा मोठा निर्णय, दोन टप्प्यात जनगणना, 11718 कोटींच्या खर्चाला मान्यता
देशभरात 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात पार पडणार, डिजिटल साधनांचा वापर, 11718 कोटींच्या खर्चाला मान्यता
दिल्लीत भाजपकडे 3 जागा असतानाही AAP ने विरोधीपक्षनेतेपद दिलं; उद्धव ठाकरेंना सांगितला इतिहास, विधानसभा अध्यक्षांची भेट
दिल्लीत भाजपकडे 3 जागा असतानाही AAP ने विरोधीपक्षनेतेपद दिलं; उद्धव ठाकरेंनी सांगितला इतिहास, अध्यक्षांना भेटले
Ladki Bahin Yojana E-KYC : नोव्हेंबरच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, ई-केवायसीमध्ये दुरुस्तीची संधी, 'या' तारखेपर्यंत मुदत
लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, ई-केवायसीमध्ये दुरुस्तीची संधी, 'या' तारखेपर्यंत मुदत, एकल महिलांबाबत मोठा निर्णय
Embed widget