Prakash Ambedkar on Vishalgad Violence : संभाजीराजेंच्या आंदोलनावेळी संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांनी धुडगूस घातला, सरकारने चौकशी करुन दंगलखोरांचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकरांची मागणी
Prakash Ambedkar on Vishalgad Violence : विशालगडावर (Vishalgad) आधीपासून लोक होते त्यांनी अतिक्रमण केलं आहे, पण अतिक्रमण काढण्याचे पण नियम आहेत. तुम्हाला ते लगेच काढता येत नाही, तसा प्रस्ताव दिल्यास ते शक्य आहे.
Prakash Ambedkar on Vishalgad Violence : विशालगडावर (Vishalgad) आधीपासून लोक होते त्यांनी अतिक्रमण केलं आहे, पण अतिक्रमण काढण्याचे पण नियम आहेत. तुम्हाला ते लगेच काढता येत नाही, तसा प्रस्ताव दिल्यास ते शक्य आहे. संभाजीराजे (Sambhaji raje) आंदोलन करत असताना जो काही प्रकार घडला आहे, आमच्या माहितीप्रमाणे संभाजी भिडे यांचे जे सैन्य आहे, धारकरी आहेत त्या धारकांनी तिथे धुडगूस घातला, अशी आमची माहिती आहे. जाणून-बुजून तेथील लोकांना मारझोड करण्यात आली आणि दुकान तोडण्यात आली. एक तंग वातावरण तिथे तयार करण्यात आलं. सरकारने याची चौकशी करून दंगलखोर कोण? होते याचा शोध घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली.
राजकारणात अनेक डावपेच असतात, त्यातील हा डावपेच आहे असे मानतो
प्रकाश आंबेडकर म्हणाले, विशाळगडाबाबतच्या (Vishalgad) बातम्या तुमच्याकडूनच आम्हाला कळत आहेत. त्यामुळे यात काही सत्य असेल असे मी मानत नाही. दुसऱ्या बाजूला यावर तोडगा निघू शकतो का? याबाबत मार्ग त्यांनी शोधावा अशी शासनाला आमची विनंती आहे. राजकारणात अनेक डावपेच असतात, त्यातील हा डावपेच आहे असे आम्ही मानतो. भविष्यात असा काही प्रस्ताव आल्यावर बघू, मी कधीही जर तर च्या भाषेवर बोलत नाही.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी सर्व पक्षांना पत्र पाठवण्यात येणार होते. अजून आम्हाला मुख्यमंत्र्यांचं पत्र आलेलं नाही ते कधी पाठवणार आहेत हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. विधानपरिषद निवडणुकीत मत फुटली याच खापर काँग्रेस वर फोडलं जात आहे. ज्या आमदारांनी काँग्रेसच्या विरोधात मतदान केलं त्यांच्यावर काय कारवाई होणार हे काँग्रेसने सांगावं, असं आवाहनही आंबेडकर यांनी केलं.
मनोज जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात ही आमची अपेक्षा आहे
निवडणूक लढवणार असं जरांगे म्हणत आहेत. त्यांनी 288 जागा लढवाव्यात ही आमची अपेक्षा आहे. लोकसभेत गरीब मराठा समाजणे श्रीमंत खासदारांना मतदान केलं. त्यामुळे हे खासदार निवडून आले जरांगेनी गरीब उमेदवार उभा केले तर समाजाला न्याय मिळेल. हाके आणि वाघमारे यांचं उपोषण सुरू असताना सामंजस्याची चर्चा झाली असती तर परिस्थिती चांगली राहिली असती, आता आगीत तेल पडलं आहे. मराठा आरक्षणाच्या आरक्षणाच ताट वेगळं असलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षाची भूमिका जाणून घेतली पाहिजे की ते जरांगेच्या मागणीच्या बाजूने आहेत का? मुख्यमंत्र्यांनी दोन-तीन दिवसात राजकीय पक्षाची भूमिका जाणून घेतली असं वाटतंय.
इतर महत्वाच्या बातम्या
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र