Prakash Ambedkar on Vasant More : 3 महिन्यात पक्षाला रामराम करणाऱ्या वसंत मोरेंवर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल, म्हणाले...
Prakash Ambedkar on Vasant More : पुणे लोकसभा (Pune Loksabha) मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणाऱ्या वसंत मोरे (Vasant More) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला.
Prakash Ambedkar on Vasant More : पुणे लोकसभा (Pune Loksabha) मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणाऱ्या वसंत मोरे (Vasant More) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. विशेष म्हणजे तीन महिन्यांपू्र्वी वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. आता त्यांनी वंचितला जय महाराष्ट्र करत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. दरम्यान पक्षाला रामराम केल्यानंतर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वसंत मोरेंवर हल्लाबोल केलाय. दीक्षाभूमीजवळ झालेल्या आंदोलनामुळे वंचितच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
वसंत मोरेंचं राजकारण आयाराम-गयारामांप्रमाणे आहे. मोरेंना माणसं ओळखता येत नाहीत. त्यांच्याकडून सातत्याने अशा गोष्टी घडत आहेत, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकरांनी केलाय. राज्यातील महिलांना लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. मात्र, गॅसचे भाव कधी कमी होणार? महिलांना अन्यधान्य पुरणार का? माझ्या बहिणींची फी भरली जाणार आहे का? असे सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले आहेत.
वंचित बहुजन आघाडीला रामराम केल्यानंतर वसंत मोरे काय म्हणाले?
ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वसंत मोरे म्हणाले, उद्धव ठाकरेंचा जो संघर्ष आहे, तो माझ्यासारख्या संघर्षातून आलेल्या कार्यकर्त्याला आकर्षित करतो. आपण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या सर्वांचा संघर्ष आपण जवळून पाहातोय. उद्धव ठाकरे जी जबाबदारी माझ्यावर सोपवतील, ती मी पार पाडेन, असंही वसंत मोरे यावेळी बोलताना म्हणाले. मी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना मेसेज टाकला होता. 'साहेब मला माफ करा', असे मी त्या मेसेजमध्ये लिहले होते. मला माझ्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करणे गरजेचे आहे. त्यानुसार मी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा फोन आला होता, असंही वसंत मोरेंनी सांगितलं.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या
Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कशावर चर्चा, प्रकाश आंबेडकरांनी सगळं सांगितलं