Pankaja Munde PC : मला ब्रेक हवाय, दोन महिने सुट्टी घेत आहे : पंकजा मुंडे
Pankaja Munde PC : "मला राजकारणातून ब्रेक हवा आहे. सध्याच्या राजकाराणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने सुट्टी घेत आहे," असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंबईतील पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे बोलत होत्या.
Pankaja Munde PC : "मी कायमच पक्षाचा आदेश अंतिम मानला आहे. मी पक्षाच्या विरोधात जात नाही मग माझ्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित का केले जातात?" असा सवाल उपस्थित करत "माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण करणे हे माझ्यासाठी दु:खद आहे," अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिली. "मला राजकारणातून ब्रेक हवा आहे. सध्याच्या राजकाराणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने राजकारणातून सुट्टी घेत आहे," असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंबईतील (Mumbai) पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे बोलत होत्या.
पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेने जोर धरल्यानंतर पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण देत मी भाजप सोडून कुठल्याच पक्षात जाणार नसल्याचं सांगितलं. "मी नाराज आणि पक्षाच्या बाहेर जाणार अशी चर्चा होते. मी भाजपमध्येच राहणार आहे. राहुल आणि सोनिया गांधी यांना भेटले नाही. माध्यमांनी चुकीची बातमी दाखवली. ही बातमी दाखवणाऱ्या संबंधित वृत्तवाहिनीवर मी मानहानीचा दावा ठोकणार आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. जेव्हा जेव्हा तिकीट दिलं नाही, तरीही मी प्रतिक्रिया दिली नाही. मी पक्षाच्या विरोधात जात नाही मग माझ्या नैतिकतेवर प्रश्न का उपस्थित करता," असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला.
'माझ्या नैतिकतेविरोधात प्रश्न?'
गेल्या काही दिवसात अनेक पक्षांनी, कार्यकर्त्यांनी मला ऑफर दिली. पण बातमी आली की मी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि मी काँग्रेसच्या वाटेवर आहे. एका सांगलीच्या नेत्याच्या माध्यमातून मी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं सांगितलं. माध्यमांनी बातमी देताना स्रोत कोणता आहे हे सांगावं, त्यामुळे मी संबंधित चॅनलवर मानहानीचा खटला दाखल करणार आहे. माझं करिअर कवडीमोलाचं नाही. 20 वर्षांपासून मी राजकारणात आहे. पाठीत खंजीर खुपसण्याचं रक्त माझ्या अंगात नाही. त्यामुळे पंकजा मुंडे पात्र असतील, अपात्र असतील त्याची उत्तरं पक्षाने दिली पाहिजेत. मी सार्वजनिकरित्या नाराजी व्यक्त केली नाही. मागील विधानपरिषदेला दोन्ही वेळेला मला फॉर्म भरुन ठेवायला सांगितले. सकाळी 9 वाजता मला फॉर्म भरायला यायला सांगितलं. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरायचा नाही असं सांगितलं. मी माझ्या पक्षाचा आदेश अंतिम मानला. मी पक्षाविरोधात असं काय केली की माझ्या नैतिकतेविरोधात प्रश्न उपस्थित केले जातात, असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.
'माझ्या पक्षाला माझा सन्मान वाटत असेल अशी अपेक्षा'
मी राहुल गांधी आयुष्यात प्रत्यक्षात पाहिलं नाही. 20 वर्ष मी राजकारणात काम करत आहेत. माझ्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित होत असेल तर हे अतिशय दु:खद आहे. माझ्यावर न्याय झालाय की अन्याय झाला हे वेळच ठरवेल. कोणत्याही पक्षातल्या कोणत्याही नेत्याशी माझ्या पक्षप्रवेशासंबंधी कुठलाही संवाद झालेला नाही. अनेक पक्षांनी माझ्याबाबत सन्मानजनक वक्तव्य करुन सांगितलं की मी त्यांच्या पक्षात यावं. माझ्या पक्षाला माझा सन्मान वाटत असेल अशी अपेक्षा आहे. माझा सन्मान स्पष्ट आणि पारदर्शक राहिला आहे.
VIDEO : Pankaja Munde on Political Break : पाडापाडीच्या राजकारणाचा कंटाळा आला, राजकारणातून 2 महिने ब्रेक