एक्स्प्लोर

Prithviraj Chavan: मविआत कोणीही मोठा भाऊ-छोटा भाऊ नाही, ज्या पक्षाकडे सर्वात चांगला उमेदवार त्यालाच प्राधान्य; पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics: शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत थेट नरेंद्र मोदी यांच्या अपयशाचा मुद्दा उपस्थित करुन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींच्या 18 सभा झाल्या, तिकडे मविआला फायदा झाल्याचा पवारांचा दावा.

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाने 13 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीही काँग्रेसला (Congress) पाठिंबा दिल्याने पक्षाचे संख्याबळ 14 वर गेले आहे. साहजिकच यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच काही नेत्यांनी 'मविआत आम्हीच मोठा भाऊ, अशा धाटणीची भाषा सुरु केली आहे.  याविषयी मविआच्या मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी शिताफीने पुढाकार घेत या प्रश्नाचे उत्तर दिले.

पृ्थ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ काही चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघात बसून सर्वात चांगला उमेदवार कोणत्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीचा संदर्भ घेऊन जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल.  हा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज आमची प्राथमिक बैठक झाली आहे. त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करु नका, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाणांनी मानले मतदारांचे आभार

या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील आणि देशातील मतदारांचे आभार मानले. लोकशाही वाचवण्यात महाराष्ट्रातील जनतेने निर्णायक भूमिका बजावली. या निवडणुकीत आम्ही धनशक्ती, तपासयंत्रणा या आव्हानांना तोंड दिलं. लोकसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला. पण निकाल पाहता या प्रयत्नांना यश मिळाले नाही, हे स्पष्ट होत झाले. महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभेची निवडणूकही याच ताकदीने लढवू. विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने आम्ही लवकरच आवश्यक ते निर्णय घेऊ, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

आणखी वाचा

विधानसभा निवडणुकीत मोदी जितक्या सभा घेतील मविआला तितका फायदा होईल; शरद पवारांनी मोदींच्या सभांचा स्ट्राईक रेटच काढला

फडणवीसांकडून फेक नरेटिव्हचा आरोप, उद्धव ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर; शरद पवारांनी करुन दिली म्हशीची आठवण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Women Reservation Bill : सर्जेराव, ज्या ताटात जेवलात त्याच ताटात घाण करू नये; काँग्रेसचा सत्यजित तांबेंना टोला, फडणवींसाना प्रश्न विचारण्याचं आव्हान
सर्जेराव, ज्या ताटात जेवलात त्याच ताटात घाण करू नये; काँग्रेसचा सत्यजित तांबेंना टोला, फडणवींसाना प्रश्न विचारण्याचं आव्हान
Ashok Chavan : काँग्रेसने महिला आरक्षणात विनाकारण खोडा घातला, त्यांना भवितव्य नाही; अशोक चव्हाणांची टीका 
काँग्रेसने महिला आरक्षणात विनाकारण खोडा घातला, त्यांना भवितव्य नाही; अशोक चव्हाणांची टीका 
Amol Khune : 'मी निर्दोष सुटलो तर जरांगेचा टकमक टोकावरून कडेलोट करावा'; मनोज जरांगेंचे सहकारी अमोल खुणे यांच्या थेट इशारा, म्हणाले...
'मी निर्दोष सुटलो तर जरांगेचा टकमक टोकावरून कडेलोट करावा'; मनोज जरांगेंचे सहकारी अमोल खुणे यांच्या थेट इशारा, म्हणाले...
Narendra Modi : मोठी बातमी! पंतप्रधान रात्री 8.30 वाजता संबोधन करणार? काय नवी घोषणा करणार? 
मोठी बातमी! पंतप्रधान रात्री 8.30 वाजता संबोधन करणार? काय नवी घोषणा करणार? 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Embed widget