एक्स्प्लोर

Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीत मोदी जितक्या सभा घेतील मविआला तितका फायदा होईल; शरद पवारांनी मोदींच्या सभांचा स्ट्राईक रेटच काढला

Maharashtra Politics: जनतेचे आभार मानण्यासाठी आजची पत्रकार परिषद. लोकशाही वाचवण्यात महाराष्ट्रातील जनतेची भूमिका महत्त्वाची. निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न, पण त्याला यश मिळालं नाही निकालावरुन स्पष्ट झालं, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

मुंबई: लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात 18 सभा आणि एक रोड शो झाला. या सर्व ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीतही पंतप्रधान मोदी (PM Modi) जितक्या जास्त सभा घेतील, तितक्या ताकदीने महाविकास आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करेल, अशी खोचक टिप्पणी शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या (MVA  Allaince) संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना आवर्जून एक गोष्ट लक्षात आणून दिली. शरद पवार यांनी म्हटले की, आमच्याकडून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. ती म्हणजे, महाराष्ट्रात ज्या काही अन्य पक्षांच्या सभा झाल्या, देशाच्या पंतप्रधानांच्या 18 सभा आणि एक रोड शो झाला. त्यांच्या 18 सभा आणि रोड शो झाला त्याठिकाणी आमच्या उमेदवारांना जनतेने फार मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. त्यामुळे आता  विधानसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त सभा होतील, तेवढं आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने स्पष्ट वाटचाल होईल. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देणं हे मी माझं कर्तव्य समजतो, असे शरद पवार यांनी म्हटले.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत थेट नरेंद्र मोदी यांच्या अपयशाचा मुद्दा उपस्थित करुन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी हे महायुती आणि एनडीए आघाडीचे सर्वात मोठे स्टार प्रचारक होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या 17 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे महाराष्ट्रात मोदींचा करिष्मा तितकासा चालला नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे. आता शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सभांचा स्ट्राईक रेटचा मुद्दा उपस्थित करत या चर्चेला आणखी हवा दिली आहे. त्यामुळे आता भाजप आणि महायुतीचे नेते यावर काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्राची अजित पवारांवर टीका, शरद पवार म्हणाले...

अजित पवार यांच्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, अशी टीका नुकतीच संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर नियतकालिकातून करण्यात आली होती. याविषयी शरद पवारांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी म्हटले की, त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितला. पण त्यांना नेमकं एवढंच सांगायचं आहे की, महाराष्ट्रातील जनतेने आमचा पराभव केला. त्याची कारणं अनेक आहे, पण ती आता आम्ही बोलू इच्छित नाही, असे उत्तर शरद पवार यांनी दिले. देशात होत असलेल्या सत्तेच्या गैरवापरासंबधी या निवडणुकीतून लोकांनी जी भूमिका घेतली, त्यामधून शहाणपणा शिकतील, अशी अपेक्षा होती. पण तो शहाणपणा सरकार शिकेल, असे दिसत नाही. त्यामुळे आणखी दोन-तीन महिन्यांनी लोकांच्या समोर जायची संधी मिळेल, तेव्हा लोक पूर्ण विचार करुन ठोस निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी म्हटले. 

आणखी वाचा

सर्व चर्चांना पूर्णविराम! महाविकास आघाडीने विधानसभेला शड्डू ठोकला; ताकदीने एकत्रित निवडणूक लढवणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
AI Impact Summit 2026: जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?

व्हिडीओ

Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस
Sanjay Raut on Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शिवसेनेत यावं, संजय राऊतांची खुली ऑफर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
AI Impact Summit 2026: जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
नांदेडमधील माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी नेत्याचं एकनाथ शिंदेंकडून कौतुक, म्हणाले...
नांदेडमधील माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी नेत्याचं एकनाथ शिंदेंकडून कौतुक, म्हणाले...
Harshvardhan Sapkal: अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
Pune BJP Congress Rada: जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
Embed widget