एक्स्प्लोर

रोहित पवारांचा गौप्यस्फोट नाही, फुसका बॉम्ब, उलट इंडिया आघाडीतील आमदार, खासदार अजित पवारांकडे येणार; दादांच्या आमदाराचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics: रोहित पवारांचा गौप्यस्फोट नसून फुसका बॉम्ब, शरद पवार आणि इंडिया आघाडीचे (INDIA  Alliance) काही आमदार, खासदार अजित पवारांकडे येणार असल्याचा खळबळजनक दावा राजू कारेमोरे यांनी केला आहे. 

Raju Karemore on Rohit Pawar: मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे काही खासदार, आमदार पुन्हा शरद पवारांकडे येणार असल्याचा दावा केलेला. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात (Maharashtra Politicle Updates) चर्चांनी जोर धरलेला. अशातच आता अजित पवारांच्या एका आमदारानं रोहित पवारांचा दावा खोडून काढला असून आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) (अजित पवार गट) आमदार राजू कारेमोरे यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र डागत गौप्यस्फोट नसून फुसका बॉम्ब, असल्याचं म्हटलं आहे. तसेच, शरद पवार आणि इंडिया आघाडीचे (INDIA  Alliance) काही आमदार, खासदार अजित पवारांकडे येणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार राजू कारेमोरे बोलताना म्हणाले की, "आमदार रोहित पवार यांनी केलेला गौप्यस्फोट नसून तो फुसका बॉम्ब आहे. अशी खिल्ली भंडाऱ्याच्या तुमसरचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी उडविली आहे. उलट शरद पवार यांच्या पक्षासह इंडिया आघाडीचे काही आमदार आणि खासदार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत येणारं असल्याचा दावा आमदार राजू कारेमोरे यांनी केला आहे. 

राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) काही आमदार शरद पवारांच्या पक्षात येणार असल्याचा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी त्यांचा दावा खोडून काढला. मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं चिंतन आणि मनन झालं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासासोबत आम्ही त्यांच्यासोबत असून अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही अजित पवार यांच्या पाठीशी एकनिष्ठेनं हिमालयासारखे उभे आहोत. आमच्यातला एकही आमदार फुटणारा नाही, उलट इतर पक्षांसह इंडिया आघाडीतून काही आमदार आणि खासदार राष्ट्रवादी पक्षात (अजित पवार) येताना दिसतील, असा दावा आमदार कारेमोरे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणालेले रोहित पवार? 

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा भोपळा फुटला मात्र केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं. अशातच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांनी मुंबईत आढावा बैठक घेतली. या बैठकीला अनेक आमदारांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी अजित दादांचे काही आमदार शरद पवारांकडे येण्याच्या तयारीत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला होता. रोहित पवार म्हणालेले की, पुढील 15 दिवसांत अजित पवार गटातील आमदारांना निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण, शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विधानसभेसाठी 30 उमेदवारांची नावं शरद पवारांनी फिक्स केली आहेत. अजित पवार गटात असलेल्या मंत्र्यांविरोधात उमेदवार फायनल झाले आहेत. 18 ते 19 आमदार संपर्कात आहेत. त्यातील किती आमदारांना पक्षात घ्यायचं, हे शरद पवार आणि जयंत पाटील ठरवणार आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Embed widget