एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....

maharashtra vidhan sabha election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक, महायुतीचे नेते सक्रिय

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजता राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या (Mahayuti) गोटात हालचालींना सुरुवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,  एक्झिट पोलचे निकाल (Maharashtra Exit Poll 2024) समोर आल्यानंतर महायुतीने प्लॅन बी आखल्याची माहिती समोर आली आहे. 

विधानसभा निवडणुकीत बहुमतापासून दूर राहिल्यास महायुतीने छोट्याछोट्या पक्षांची मोट बांधायची रणनीती आखली आहे. जे पक्ष महायुतीत नाहीत, अशांशी संपर्क साधला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आम्ही कोणत्याही अपक्षांच्या संपर्कात नसल्याचे गुरुवारी सांगितले होते. मात्र, महायुतीच्या गोटातून अपक्ष आणि बंडखोरांनी संपर्क साधण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. महायुतीचे नेते छोट्या घटकपक्षांशी बोलणी करत आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे आता राज्यात सत्तेतील वाटा देऊन घटक पक्षांना जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती आहे.

निकालापूर्वी ठाकरे गट सावध

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधल्याचे समजते. मतमोजणीवेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी तसंच उमेदवारांनी काय काळजी घ्यावी, यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि तज्ञांनी उमेदवार आणि प्रमुखांना मार्गदर्शन केल्याचे समजते. 

टपाली आणि EVM मधील मतमोजणीसंदर्भातील बारकावे, कोणत्या वेळी आक्षेप घ्यावेत, लेखी तक्रार याविषयी कालच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीतील उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात झालेल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी उद्धव ठाकरे आणि पक्षाकडून खबरदारी घेतली जात आहे.

निकालानंतर 12 तासांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार: वडेट्टीवार

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. आम्हाला कोणतीही जुळवाजुळव करावी लागू शकणार नाही. सत्तास्थापनेत आम्हाला कोणतीही अडचण होणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. तर विजय वडेट्टीवार यांनी आम्ही निकालानंतर 12 तासांत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करु, असे सांगितले.

राज्यात यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात 61 टक्के मतदान झाले होते. मात्र, अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात तब्बल 66 टक्के मतदान झाले आहे. या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार, यावर या निवडणुकीचा अवलंबून असेल. त्यामुळे आता उद्या काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget