एक्स्प्लोर

विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

Naseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली आढळल्याने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024 Result) राज्यात 20 नोव्हेंबर 2024 मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल (Exit Poll 2024) आले आहेत. येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यातच काँग्रेस (Congress) नेते नसीम खान (Naseem Khan)यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली आढळल्या आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले असून नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वीच मुंबईत बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर आता नसीम खान यांच्या देखील जीवाला देखील धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. बाबा सिद्दिकी प्रकरणानंतर मुंबई पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. 

नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ

नसीम खान यांच्या कार्यालयात दोन संशयित आढळून आले होते. या दोन संशयितांच्या मोबाइलमध्ये नसीम खान यांच्याशी संबधित काही आक्षेपार्ह चॅटही आढळले होते. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी नसीम खान यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाजवळ स्थानिक पोलीस ठाण्यांना बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नसीम खान यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. 

चिपळूणमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात संशयास्पद हालचाली

दरम्यान, विधानसभा निवडणुकीची 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याआधी मतपेट्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. मतपेट्यांना कुठलीही हानी पोहोचू नये म्हणून 24 तास सीसीटीव्हीची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. चिपळूणमध्ये मात्र स्ट्राँग रुमच्या परिसरात मोठी घटना घडल्याचे दिसून आले. स्ट्राँग रुमच्या परिसरात फिरणाऱ्या संशियतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिपळूणमध्ये स्ट्राँग रूमच्या परिसरात काही लोक फिरत होते. ही बाब समोर आल्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने चिपळूण पोलीस स्थानकाच्या बाहेर एकत्र जमले होते. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

नागपूरात मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था

दरम्यान, नागपूरात मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.  मतमोजणी केंद्रावर तीन लेअर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ, त्यानंतर राज्य राखीव पोलीस, मध्य प्रदेश पोलीस आणि तिसऱ्या लेअरला महाराष्ट्र पोलीस तैनात आहेत. तसेच संपूर्ण परिसराला सीसीटीव्हीचा 24 तास पहारा आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे ईव्हीएम असलेल्या मतमोजणी केंद्रावर सुरक्षा अलर्टवर आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 

आणखी वाचा 

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
Embed widget