एक्स्प्लोर

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?

वाढलेल्या मताचा टक्का कोणाला रडवणार आणि कोणाला गुलाल लावणार? याचे उत्तर अवघ्या काही तासांवर आलं आहे. उद्या (23 नोव्हेंबर) मतमोजणी होत असून दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.  

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यानं पुन्हा एकदा करून दाखवलं राज्यातील सर्वाधिक मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेल्या मताचा टक्का कोणाला रडवणार आणि कोणाला गुलाल लावणार? याचे उत्तर अवघ्या काही तासांवर आलं आहे. उद्या (23 नोव्हेंबर) मतमोजणी होत असून दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.  

लाडक्या बहिणींनी कौल कोणाला दिला? 

दरम्यान, जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात झालं आहे. करवीरमध्ये 84.96 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड विधानसभेला पुरुषांच्या तुलनेत महिलांचं मतदान सर्वाधिक झालं आहे. चंदगड विधानसभेला महिलांची टक्केवारी 75.47 असून पुरुषांची टक्केवारी 74.49 टक्के आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महिलांच्या 2.78 टक्के मतदानाचा वाढला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कौल कोणाला दिला आहे, याची उत्सुकता ताणली गेली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात एकूण 33 लाख 5 हजार 98 मतदारापैकी 25 लाख 32 हजार 657 मतदारांनी मतदार केले. यामध्ये एकूण 16,69,270 पुरुषांपैकी 12,97,561 पुरुषांनी, 16,35,642 महिलापैकी 12,35,010 महिलांनी व 186 पैकी 86 इतर मतदारांनी मतदान केले, यात पुरुषांची टक्केवारी 77.73, महिलांची टक्केवारी 75.51 तर इतरांची टक्केवारी 46.24 इतकी आहे. या मतदारांची एकूण टक्केवारी 76.63 इतकी आहे.  

जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी

चंदगड विधानसभा 

  • पुरुष 163470, महिला 164201 व इतर 9 असे एकूण 327680 मतदार. यापैकी पुरुष 121774 (74.49 टक्के), महिला 123918 (75.47टक्के), व इतर 3 (33.33 टक्के), अशा एकूण 245695 (74.98 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

राधानगरी विधानसभा

  • पुरुष 177302, महिला 167108 व इतर 12 असे एकूण 144422 मतदार. यापैकी पुरुष 140315 (79.14 टक्के) महिला 129365 (77.41 टक्के) व इतर 9 (75 टक्के) अशा एकूण 269689 (78.30 टक्के ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

कागल विधानसभा

  • पुरुष 171356, महिला 172311 व इतर 5 असे एकूण 343672 मतदार. यापैकी पुरुष 143169 (83.55 टक्के), महिला 140395 (81.48 टक्के) व इतर 4 (80 टक्के) अशा एकूण 283568 (82.51 टक्के) मतदारांनी हक्क बजावला. 

कोल्हापूर दक्षिण विधानसभा 

  • पुरुष - 187400, महिला 185233 व इतर 51 असे एकूण 372684 मतदार. यापैकी पुरुष 142707 (76.15टक्के), महिला 139007 (75.04 टक्के) व इतर 29 (56.86 टक्के) अशा एकूण 281743 (75.60 टक्के) मतदारांनी हक्क बजावला. 

करवीर विधानसभा 

  • पुरुष 168193 महिला 156968 व इतर 0 असे एकूण 325161 मतदार. यापैकी पुरुष 144902(86.15 टक्के), महिला 131343 (83.68 टक्के) व इतर 0 (0 टक्के) अशा एकूण 276245 (84.96 टक्के) मतदारांनी हक्क बजावला. 

कोल्हापूर उत्तर विधानसभा

  • पुरुष 148809, महिला 152916 व इतर 18 असे एकूण 301743 मतदार. यापैकी पुरुष 100597 (67.60 टक्के), महिला 97059 (63.47 टक्के) व इतर 10 (55.56 टक्के) अशा एकूण 197666 (65.51 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.  

शाहूवाडी विधानसभा 

  • पुरुष 157316, महिला 148923 व इतर 7 असे एकूण 306246 मतदार. यापैकी पुरुष 125620 (79.85 टक्के)  महिला 116363 (78.14 टक्के) व इतर 4 (57.14 टक्के) अशा एकूण 241987 (79.02 टक्के) मतदारांनी हक्क बजावला. 

हातकणंगले विधानसभा 

  • पुरुष 173449, महिला 168216 व इतर 20 असे एकूण 341685 मतदार. यापैकी पुरुष 136055 (78.44 टक्के) महिला 125145 (74.40 टक्के) व इतर 15 (75 टक्के) अशा एकूण 261215 (76.45 टक्के) मतदारांनी हक्क बजावला. 

इचलकरंजी विधानसभा

  • पुरुष 158721, महिला 153881 व इतर 62 असे एकूण 312664 मतदार. यापैकी पुरुष 111916 (70.51 टक्के) महिला 105927 (68.84 टक्के) व इतर 10 (16.13 टक्के) अशा एकूण 217853 (69.68 टक्के) मतदारांनी हक्क बजावला. 

शिरोळ विधानसभा 

  •  दक्षिण पुरुष 163254, महिला 165885 व इतर 2 असे एकूण 329141 मतदार. यापैकी  पुरुष 130506 (79.94 टक्के) महिला 126488 (76.25 टक्के) व इतर 2 (100 टक्के) अशा एकूण 256996 (78.08 टक्के) मतदारांनी हक्क बजावला. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
Nashik News: लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
Embed widget