एक्स्प्लोर

Nitesh Rane : देशाला इस्लामिक राष्ट्र बनवायचा प्रयत्न, सुदैवाने राज्यात हिंदुत्ववादी सरकार, मविआ असती तर...; वक्फच्या दाव्यावरुन नितेश राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane: वक्फ बोर्ड कायदा आपल्या देशात असून तो आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग: आमच्याजवळ जी  माहिती होती ती आम्ही लोकांसमोर आणली. हा फार मोठा धोका आहे. वक्फ बोर्ड कायदा आपल्या देशात आहे, तो आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतं तर एवढ्यात जिल्ह्यातील 50 ते 60 टक्के जमीन यादीप्रमाणे 156 ठिकाणची जागा देऊन टाकली असती. अशी टीका  मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे.

जिल्ह्यातील एक खासदार आणि तिन्ही आमदार हिंदुत्ववादी विचाराचे आहेत. अन्यथा वक्फ बोर्ड दावा केलेली जागा एवढ्यात देऊन टाकली असती. तसेच या यादीच्या पलीकडे त्यांनी काय मस्ती केली आहे का, तेही आम्ही तपासणार आहोत. नागरिकांनी याबद्दलची सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे. हे मोठे षडयंत्र आहे, यामधून हिंदू समाजाला आपल्या देशातून कमी कसं करता येईल याचा प्रयत्न आहे. आमचं केंद्र सरकार असेपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना शब्द देतो एक इंचही जागा वक्फ बोर्डला देणार नाही. असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.  

देवांकडे हे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत असतील तर... 

वक्फ बोर्डने आपल्या देवस्थानच्या जागेवर दावा ठोकण्याची हिंमत केली असेल तर सिंधुदुर्गातील हिंदू समाजाने यांचा डाव मोडून काढण्याची हिंमत केली पाहिजे. आज आपल्या देवांकडे हे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत असतील तर उद्या आपल्या राहत्या घरांना देखील ही लोक सोडणार नाहीत. त्यामुळे या सर्व बाबींचा अभ्यास करून मी ही प्रशासनशी बोलणार आहे. केंद्र सरकारने वक्फ बोर्ड कायद्यामध्ये तरतुदी सुचवल्या आहेत. ही यांची मुजोरी मोडून काढण्याचे प्रयत्न करणार. देशात रेल्वे, डिफेन्सनंतर वक्फ बोर्डकडे सर्वात जास्त जमिनीचा ताबा केला आहे. 

कुठलंही इस्लामिक आक्रमण सहन करणार नाही.

आज आपले एक एक देवस्थानावर ताबा ठोकण्याचा दावा ते करत असून उद्या आंगणेवाडी देवस्थान, कुणकेश्वर देवस्थान, रामेश्वर देवस्थानवर देखील दावा ठोकू शकतात. आपल्या देशात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असल्यामुळे आम्ही जागृत असून ही लोक आता तेवढी हिंमत करू शकणार नाहीत. आम्ही असं कुठलंही इस्लामिक आक्रमण सहन करणार नाही. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
Sanjay Shirsat : शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal PC : कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रीपद नको, छगन भुजबळ स्पष्टच बोलले..HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Navi Mumbai First Mango Price : वाशिमच्या APMC मध्ये केसर आंब्याची पहिली पेटी दाखल, भाव किती?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
Sanjay Shirsat : शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
Embed widget