MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava: मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार : राज ठाकरे
MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava : आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंची राजकीय भूमिका आणि मनसेची यापुढची दिशा काय असेल? या प्रश्नांची उत्तरं याच गुढीपाडवा मेळाव्यात मिळणार आहेत.
LIVE
Background
MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी मुंबईतलं शिवाजी पार्क मैदान सज्ज झालंय. मनसेच्या या पारंपरिक मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार, याविषयी केवळ मनसैनिकच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राच्या मनात प्रश्न आहे. याचं कारण आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंची राजकीय भूमिका आणि मनसेची यापुढची दिशा काय असेल? या प्रश्नांची उत्तरं याच गुढीपाडवा मेळाव्यात मिळणार आहेत.
Raj Thackeray On Amit Shah: अमित शाहांच्या भेटीला गेलो कारण.....
Raj Thackeray On Amit Shah: अमित शहा यांच्या भेटीनंतर चक्र सुरु झाली. मात्र का गेलो तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले आपण एकत्र आले पाहिजे. देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले एकत्र आले पाहिजे. म्हणून अमित शाहांना फोन करुन म्हटलो एकत्र यायचे म्हणजे काय? यासाठी अमित शाहांना भेटायला दिल्लीला गेलो.
Raj Thackeray On Alliance: मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार : राज ठाकरे
Raj Thackeray On Alliance: शिवसेनेचे प्रमुख व्हायचं असते तर आधीत झालो असतो. पक्ष फोडून मला कोणतीही गोष्ट करणार नाही. मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. मी फक्त शिवसेनाप्रमुखांच्या हाताखालीच काम केले. मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार आहे.
Raj Thackeray On Doctar Election Duty: डॉक्टर मतदारांची नस तपासणार आणि नर्स डायपर बदलणार का?, राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray On Doctar Election Duty: डॉक्टर मतदारांची नस तपासणार आणि नर्स डायपर बदलणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. ज्या डॉक्टर, नर्सला निवडणुकांच्या ड्युटी लावल्या त्यांनी जाऊ नये, त्यांना कोण नोकरीवरून काढतो त्यांना मी बघतो, असा इशारा दिला.
Raj Thackeray MNS Gudi Padwa: राज ठाकरे शिवाजी पार्कात दाखल, थोड्याच वेळात 'राजगर्जना' होणार
Raj Thackeray MNS Gudi Padwa: राज ठाकरे सभास्थळाकडे पोहचले आहेत. थोड्याच वेळात मेळाव्याला संबोधित करणार आहे.
Raj Thackeray MNS Gudi Padwa: राज ठाकरेंच्या सभेअगोदर मुस्लीम मनसैनिकांनी केले नमाज पठण
Raj Thackeray MNS Gudi Padwa: राज ठाकरे यांचे विचार आवडत असल्यामुळे शिवाजीनगर परिसरातून अनेक मुस्लिम मनसैनिक हे शिवाजी पार्क मैदानात दाखल झाले आहेत. एकीकडे रमजान सुरू असल्यामुळे दिवसभराचा उपवास ठेवून त्यांनी शिवाजी पार्क मैदानातच रोजा सोडला, तिथे नमाज देखील पठण केले. जरी मनसे पक्षाने हिंदुत्ववादी भूमिका घेतली असली तरी देखील आम्ही राज ठाकरे यांच्या सोबत आहोत, अशी भावना व्यक्त केली आहे.