''जरांगेंनी शरद पवारांना जाब विचारावा, केवळ फडणवीसांमुळेच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला''; विखे पाटलांनी सांगितला इतिहास
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे अकोल्यात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेतली.
अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण (Agitation) आज स्थगित केलं आहे. सलाईन लावून उपोषण करण्याला काही अर्थ नाही, असे म्हणत जरांगे यांनी ग्रामस्थ व मराठा बांधवांच्या विनंतीनंतर 5 व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं. आता, विधानसभा निवडणुकांची रणनीती आखली जात असून 13 ऑगस्ट रोजी आपण पुढील घोषणा करणआर आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी हिंगोलीतून शांतता रॅलीला सुरुवात केली होती. या शांतता रॅलीचा पहिला टप्पा पार पडला असून आता लवकरच दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. दुसऱ्या टप्प्यात ते सोलापूर, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe patil) यांना प्रश्न विचारला असत, मनोज जरांगेंचं स्वागत करतो असे त्यांनी म्हटलं. मात्र, मराठा आरक्षणाबाबत जरांगे हे शरद पवारांना प्रश्न का विचारत नाहीत, असा सवालही विशाल पाटील यांनी केला.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे अकोल्यात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी, अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेवरही त्यांनी भूमिका मांडली. तर, मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्यावरही भाष्य केलं. कोणी दौरा करावा करावा नाही या संदर्भात स्वातंत्र्य आहे, जरांगे पाटील इकडे येत असतील तर स्वागत आहे. माझी जरांगे पाटलांना विनंती आहे, त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मार्गी लागला आहे. नंतर सरकार बदलल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी झोपा काढल्या. तरीही, पुन्हा सरकार आल्यानंतर आम्ही 10 टक्के आरक्षण देण्याचा ठराव केला, तो टिकला आहे, त्याला कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही, असे विखे पाटील यांनी म्हटले.
जरांगे पाटील सातत्याने देवेंद्र फडणवीसांवर आरोप का करतात हे कळत नाही. चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांना, मी का आरक्षण देऊ शकलो नाही, याबद्दल जरांगेंनी जाब विचारावा. केवळ एका व्यक्तीला टार्गेट करून चालणार नाही, देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत करायला पाहिजे होतं, असेही विखे पाटील यांनी म्हटले. ज्यांनी आरक्षण दिलं नाही, मला आरक्षण मान्य नाही, असे विधान पवार साहेबांनी केलं आहे. 1994 मध्ये जो काही निर्णय झाला, आरक्षणाच्या बाबतीत चुप्पी साधायची भूमिका स्पष्ट करायची नाही. महाविकास आघाडीतील एकही नेता उद्धव ठाकरेंसह आरक्षणावर बोलायला तयार नाही, त्यांना राजकारण करायचे आहे, त्यांची भूमिका स्पष्ट आहे. आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आमची भूमिका स्पष्ट केली, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मुद्दयावरुन मनोज जरांगे यांना लक्ष्य केलंय.
अमोल मिटकरींच्या नाराजीवर भाष्य
अकोला नियोजन मंडळाची बैठक मी आज व्हीसीद्वारे बैठक घेतली. विविध विकासकामांच्या संदर्भात आढावा घेतला. अतिशय चांगल्या सूचना आमदार महोदय आणि सदस्यांनी केल्या आहेत. दीडशे कोटी रुपयांचा आराखडा यावर्षी राज्य सरकारने आपल्याला मंजूर केला आहे. समाधान पूर्व वातावरणात चर्चा झाली. सर्व उपस्थित होते, काही ऑनलाईन होते एकमताने आराखडा मंजूर करण्यात आल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. अमोल मिटकरी यांचा गैरसमज झाला होता, मिटकरी आज स्वतः बैठकीला उपस्थित होते. त्यांनी केलेल्या सूचनांचे मी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यांच्या काही सूचना असतील तर निश्चितपणे तसा विचार करू. त्यांचा गैरसमज नव्हताच, एखादा बाबतीत कम्युनिकेशन गॅप होता. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत विचारले असता ते समाधानी आहेत, असं माझं मत आहे, असेही विखे पाटील यांनी मिटकरींच्या नाराजीवरील प्रश्नावर उत्तर देताना म्हटले.
हेही वाचा
बेधडकपणा... संसदेत विशाल पाटलांचं इंग्रजीत भाषण; पहिलाच प्रश्न सांगली अन् कोल्हापूरकरांसाठी