EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
अनेक ठिकाणी EVM मधे घोटाळा झाल्यामुळं महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. EVM वर माझा आक्षेप असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी व्यक्त केलं.
Mahadev Jankar : मला महायुतीचा (Mahayuti) अनुभव खूप वाईट आला आहे. त्यामुळं मी त्यांच्यापासून बाहेर आहे. काँग्रेसला (Congress) अजून चाखल नाही. त्यामुळं त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी व्यक्त केलं. अनेक ठिकाणी EVM मधे घोटाळा झाल्यामुळं महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. EVM वर माझा आक्षेप आहे, देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करु असा इशारा जानकर यांनी दिला आहे. मी स्वतः इंजिनियर, EVM हॅक करता येत, त्यामुळं मला सगळं माहित असल्याचे जानकर म्हणाले.
मला महायुतीचा अनुभव खूप वाईट
महायुतीला एवढं बहुमत आलं आहे, त्यामुळं राज्याचा मुख्यमंत्री कोण बसवायचं? हे त्यांचं ते ठरवतील असे जाकर म्हणाले. महायुतीला एवढं यश मिळालं असताना निर्णय घेत नाहीत त्यावर मी काय बोलणार? असेही जानकर म्हणाले. भाजप कोणाला सरप्राइज मुख्यमंत्री करेल? यात मला आजिबात पडायचं नाही असंही ते म्हणाले. मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे, त्यामुळं मी त्यांच्यापासून बाहेर असल्याचे जानकर म्हणाले.
सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचं आहे
अनेक ठिकाणी EVM मध्ये घोटाळा झाल्यामुळं महायुतीच्या जागा निवडून आल्या असल्याचे महादेव जानकर म्हणाले. EVM वर माझा आक्षेप आहे, देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला. EVM मुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर आहे. त्यामुळं मला सगळं माहीत असल्याचे जानकर म्हणाले.
सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहे, त्यामुळं याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचा खून करण्याच काम झालं असल्याचे जानकर म्हणाले.
आमदार रत्नाकर गुट्टे यांनी न विचारता निर्णय घेतला तर कारवाई करु
माझ्या पक्षाचा सध्या एकच आमदार आहे, कोणासोबत जायचं याचा अजून निर्णय झालेला नाही. पण जर त्याने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करु असे म्हणत महादेव जानकर यांनी गंगाखेडचे आपल्याच पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना इशारा दिला आहे. मला सगळ्या गोष्टीच्या ठेचा लागल्या आहेत. त्यामुळं मी सगळ्या गोष्टी माझ्या ताब्यात ठेवल्या आहेत. त्यामुळं माझा एक आमदार असला तरी तो पक्षावर दावा सांगू शकत नाही असेही जानकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: