(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vidhan Parishad Election : काँग्रेसची 8 मतं फुटली, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का, ठाकरे-पवारांना मतं फोडण्यात अपयश
Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल (Vidhan Parishad Election) हाती येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत भाजपचे पाच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही 2 उमेदवार विजयी झाले आहेत.
Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल (Vidhan Parishad Election) हाती येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत भाजपचे पाच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही 2 उमेदवार विजयी झाले आहेत. एका जागेवर अजूनही जोरदार लढत सुरु आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फोडण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे अजित पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मत फोडण्यास अपयश
काँग्रेसच्या उमेदवार आणि राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी निवडणुकीमध्ये विजय मिळवला. मात्र, निवडणुकीत (Vidhan Parishad Election) काँग्रेसची मतं फुटली आहेत. काँग्रेसची एकूण 8 मतं फुटली आहेत. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांचा राजकीय वरचष्मा पाहायला मिळतोय. शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही. उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचया शिवसेनेचं एकही मत फोडता आलं नाही गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाची मते फुटणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अजित पवारांची मत फोडण्यात अपयश आल्याचे विधान परिषद निवडणुकीवरून सिद्ध झालं आहे. दुसरीकडे काँग्रेसची मतं फुटल्याने एक प्रकारे महाविकास आघाडीलाच या निवडणुकीमध्ये धक्का बसल्याची चर्चा आहे.
काँग्रेसकडून आमदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न नाही
विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर आपल्या आमदारांची मतं फुटू नयेत, यासाठी प्रत्येक पक्ष काळजी घेत होता. अजित पवारांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले नव्हते.
कोण कोणते उमेदवार विजयी?
भाजपचे विजयी उमदेवार
1) योगेश टिळेकर - 26 मते
2) पंकजा मुंडे - 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे - 26 मते
5) सदाभाऊ खोत - 24
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार
1) भावना गवळी -
2) कृपाल तुमाने
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर
काँग्रेस विजयी उमेदवार
1) प्रज्ञा सातव - 26
इतर महत्वाच्या बातम्या