Jalgaon Politics : मुंडे बहिण भावानंतर राज्यातील आणखी एका आमदार भावाविरोधात बहिण मैदानात
Maharashtra Politics: मुंडे बहिण भावानंतर राज्यातील आणखी एका आमदार भावाविरोधात बहिण मैदानात उतरणार आहे.
![Jalgaon Politics : मुंडे बहिण भावानंतर राज्यातील आणखी एका आमदार भावाविरोधात बहिण मैदानात maharashtra News Jalgaon News Sister Brother Politics In Pachora Taluka Vaishali Suryawanshi vs Kishor Patil Jalgaon Politics : मुंडे बहिण भावानंतर राज्यातील आणखी एका आमदार भावाविरोधात बहिण मैदानात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/2108712a1aaa5cb5d4d56902eeb02a3a1682330138852443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Politics: राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलले आहेत. त्यानुसार ठाकरे गटाने ही शिंदे गटाच्या विरोधात पर्याय शोधण्याची तयारी सुरु केली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) पाचोरा तालुक्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील (MLA Kishore Pati) यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. तर आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात त्यांची बहीण तथा ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryavanshi) याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे मुंडे बहिण भावानंतर राज्यातील आणखी एका आमदार भावाविरोधात बहिण मैदानात उतरणार आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला सोडून एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. यात जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांचा सहभाग होता. यात पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांचा देखील सहभाग होता. तर कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले दिवंगत माजी आमदार आर ओ पाटील यांचे किशोर पाटील हे पुतणे आहेत. विशेष म्हणजे आर ओ पाटील यांनीच किशोर पाटील यांना राजकारणात आणले आणि आमदार देखील केले होते. त्यामुळे आमदार किशोर पाटील आजही आर. ओ. पाटलांना त्यांचे गुरु मानतात. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेत मोठे फूट पडली. यावेळी आमदार किशोर पाटील शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी किशोर पाटील यांच्या या निर्णयाच्या विरोधात थेट भूमिका घेतली आहे.
भावाविरोधात बहिण मैदानात
एकीकडे एकनिष्ठ आर. ओ. पाटील तर दुसरीकडे त्यांचे पुतने किशोर पाटील यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात गेल्याने आमदार किशोर पाटील यांच्यावर मोठी टीका झाली होती. यांनतर भाऊ किशोर पाटील यांच्या विरोधात आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी या राजकारणाच्या मैदानात उतरल्या. वैशाली सूर्यवंशी यांना आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात पर्याय म्हणून ठाकरे गटाने राजकारणाच्या मैदानात उरतवले. गेल्या काही दिवसांपासून वैशाली सूर्यवंशी आणि आमदार किशोर पाटील यांचे एकमेकांवरील आरोपांमुळे पाचोरा तालुक्यातील भाऊ विरोधात बहीण असा जोरदार राजकीय सामना रंगताना पाहायला मिळत आहे.
आगामी निवडणुकीत सामना रंगणार...
आमदार किशोर पाटील यांच्याविरोधात पर्याय असलेल्या वैशाली सूर्यवंशी यांना बळ मिळावे म्हणून रविवारी आमदार पाटील यांच्या होमपीचवर उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. याच सभेवरुन दोन्ही बहिण-भावाने एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला. तर उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर वैशाली सूर्यवंशी यांना चांगलंच बळ मिळाल्याचे सांगितलं जात असून, त्याचा आगामी निवडणुकीत मोठा परिणाम होईल असे बोलले जात आहे. त्यामुळे पाचोरा तालुक्यात बहिण भावांमधील हा राजकीय आखाडा चांगलाच रंगणार असल्याचे चित्र आहे. पण नेमकं जनता ही आमदार किशोर पाटील यांच्या पाठिशी उभे राहते की कट्टर शिवसैनिक असलेले आर.ओ.पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांच्या पाठिशी उभी राहते हे पुढील काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Beed News : मनोमिलनाला महिना उलटत नाही तो पुन्हा मुंडे भाऊ-बहीण आमनेसामने
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)