राजकारणात निष्कलंक राहीलेल्या नेत्याचा उचित गौरव; अडवाणींना भारतरत्न, राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
Lal krishna Adwani Bharat Ratna : देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना दिला जाणार आहे.
Lal krishna Adwani Bharat Ratna : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना (Lal krishna Adwani) देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर (Bharat Ratna Awrad) करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येत असून, राजकारणात निष्कलंक राहीलेल्या नेत्याचा उचित गौरव झाल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
भाजपच्या वैचारिक जडणघडणमध्ये अडवाणींचा खूप मोठा वाटा : विनोद तावडे
आनंद होणे स्वाभाविक आहे. लालकृष्ण अडचणींना आम्ही जे जवळून पाहिले आणि अनूभवलं आहे, म्हणजेच एक व्यक्ती म्हणून मी त्यांना पाहिले आहे. भाजपची वैचारिक जडणघडण करण्यामध्ये अडवाणींचा खूप मोठा वाटा आहे. आज दिन दयाळ यांच्यानंतर त्यांचा नक्कीच वाटा होता. राजकारणामध्ये राहून देखील कसे आदर्शपणे राजकारण करता येते त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. हिंदुत्ववाद म्हणजे याच्या विरोधात त्याच्या विरोधात असे नसून, तो एक सांस्कृतिक राष्ट्रवाद असल्याचे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात लोकांना पोहचवले. त्यामुळे त्यांना आज हा पुरस्कार जाहीर झाल्याने आंनद होत आहे. राममंदिरात त्यांचं योगदान आहेतच, कार्यकर्त्यांना जे प्रेम देणं त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहचलो असल्याचं विनोद तावडे म्हणाले आहेत.
अडवाणी सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत : देवेंद्र फडणवीस
आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान आदरणीय लालकृष्ण अडवाणी जी यांना भारताचा सर्वोच्च सन्मान, भारतरत्न घोषित झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. देशाच्या विकासात तुमचे योगदान अविस्मरणीय आहे. आपल्या सर्वांचा सांस्कृतिक वारसा असलेल्या प्रभू श्री राम मंदिर चळवळीसाठी तुमचा संघर्ष सदैव स्मरणात राहील. तुमचे संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी समर्पित होते आणि तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहात, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हमारे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, वरिष्ठ नेता, पूर्व उप प्रधानमंत्री आदरणीय श्री लालकृष्ण आडवाणी जी इन्हे भारत के सर्वोच्च सम्मान भारत रत्न घोषित होने पर हार्दिक शुभकामनाएँ एवम् प्रणाम।
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 3, 2024
देश के विकास में आपका योगदान अविस्वमरणीय है। हम सबकी सांस्कृतिक धरोहर प्रभु श्री राम मंदिर… pic.twitter.com/fswffb2kAJ
रामभक्तांसाठी अभिमानाची बाब : चंद्रशेखर बावनकुळे
या देशाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय लालकृष्ण अडवाणीजी यांना भारतरत्न देण्याची माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेली घोषणा अत्यंत आनंददायी व सुखद आहे. देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांचा गौरव होणे ही माझ्यासह प्रत्येक भारतीय व रामभक्तांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन. स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत अडवाणीजी यांची महत्त्वाची भूमिका आहे. देशाचे उपपंतप्रधान म्हणून त्यांनी केलेली कामगिरी मोलाची आहे. आदरणीय अडवाणीजी यांना 'भारतरत्न' घोषित केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार, असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
देश के वरिष्ठ नेता एवं हमारे मार्गदर्शक आदरणीय श्री लालकृष्ण आडवाणीजी को भारत रत्न देने की माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी द्वारा किए जाने की गई घोषणा अत्यंत सुखद है। उन्हें देश के सर्वोच्च नागरिक सम्मान से सम्मानित किया जाना मेरे सहित हर भारतीय और राम भक्त के लिए गर्व की बात… pic.twitter.com/xk8fgSjOJO
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) February 3, 2024
राजकारणात निष्कलंक राहीलेल्या नेत्याचा उचित गौरव : अतुल भातखळकर
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाले, ही माझ्या सारख्या लाखो कार्यकर्त्याना सुखावणारी बाब आहे. काँग्रेस आणि देशातील अन्य पक्ष ज्या पुरोगामीत्वाच्या, धर्मनिरपेक्षतेच्या बाता करतात त्या पोकळ आहेत. भारतातील धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदूंना मूर्ख बनवणारा, गाफील ठेवणारा, मुस्लीम धार्जिणा खुळखुळा आहे. हे देशाला सर्वप्रथम ओरडून ओरडून सांगणारा नेता म्हणजे अडवाणीजी. अयोध्येत साकारलेले राम मंदीर म्हणजे कोट्यवधी हिंदूंच्या स्वप्नांची पूर्तता. अडवाणी नसते तर हे स्वप्न कधीच प्रत्यक्षात आले नसते. प्रदीर्घ काळ राजकारणात राहूनही निष्कलंक राहीलेल्या या नेत्याचा मोदी सरकारने उचित गौरव केला आहे. माननीय अडवाणीजींचे मनापासून अभिनंदन. भारत माता की जय, असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाले, ही माझ्या सारख्या लाखो कार्यकर्त्याना सुखावणारी बाब आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 3, 2024
कांग्रेस आणि देशातील अन्य पक्ष ज्या पुरोगामीत्वाच्या, धर्मनिरपेक्षतेच्या बाता करतात त्या पोकळ आहेत. भारतातील धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदूंना मूर्ख बनवणारा,… https://t.co/J2zGM6mWQQ
इतर महत्वाच्या बातम्या: