एक्स्प्लोर

Gopichand Padalkar : जयंत्या, जातीवंत पाटील असशील तर तारीख आणि वेळ सांग, मी वाळव्यात येतो; गोपीचंद पडळकर पुन्हा घसरले

Gopichand Padalkar Vs Jayant Patil : मला बदनाम करून मी संपणार नाही, अनेक गावठी कुत्र्यांना तुडवत तुडवत मी इथंपर्यंत आलोय असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

सांगली : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची पुन्हा एकदा जिभ घसरली. तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली. तसेच जातीवंत पाटील असाल तर मला तारीख आणि वेळ सांगा, मी वाळव्यात येतो असं म्हणत त्यांनी थेट आव्हान दिलं. जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली. महत्त्वाचं म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समज देऊनही पडळकरांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

जयंत पाटलांवर या आधी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचा निषेध करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या आधी सांगलीमध्ये संस्कृती बचाव कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. त्यावेळी जयंत पाटलांचे निकटवर्तीय असलेल्या दिलीप पाटील यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली होती. त्या टीकेचा समाचार घेताना गोपीचंद पडळकरांनी दिलीप पाटील यांचा वाळव्याचा कुत्रा असा उल्लेख केला.  

मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे. तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळीकुट्ट अंधाराची रात्र असेल अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना आव्हान दिलं.

Gopichand Padalkar Speech : जातीवंत पाटील असशील तर...

जयंत पाटलांवर टीका करताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, "मला गोप्या म्हटलं गेलं, मग मी तुला जयंत्या म्हटलं तर चालेल का? जयंत्याला आणि वाळव्याच्या कुत्र्याला आवाहन करतो, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर तुम्ही उद्या दुपारी पत्रकार परिषद घ्या. गोपीचंद पडळकरने इश्वरपूरमध्ये यायचं की वाळव्यात यायचं, दिनांक, वार आणि वेळ सांगा मी तिथे येतो. माझ्याकडे पोरं पाठवायची गरज नाही आणि तुमच्याकडे ती हिंमत नाही. तुम्ही सांगाल तिथे मी येतो."

Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंतराव, तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं?

माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातील आहे. तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, जयंतरावांना माझा सवाल आहे, तुझ्या कुठल्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं? विरोधक म्हणतात की माझे संस्कार खराब आहेत, पण ते काहीही म्हणू देत, मला काही फरक पडत नाही असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

Gopichand Padalkar Speech Today : अनेक कुत्र्यांना तुडवत इथंपर्यंत आलोय

गोपीचंद हा फकीर माणूस आहे, ना मला आगा ना पिछा. मला बदनाम करून मी संपणार नाही. अनेक गावठी कुत्र्यांना तुडवत तुडवत मी इथंपर्यंत आलोय असं गोपीचंद पडळकर म्हणाले. माझ्या विरोधातमध्ये अनेक वादळं, त्या वादळात उभे राहतो तो गोपीचंद पडळकर. जतमधील मायबापांनी मला निवडून दिलंय. पण माझ्यावर टीका करणारी ही औलाद हिंदू विरोधी आहे, त्याला जागा दाखवायची वेळ आली आहे अशा शब्दात पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली.

Gopichand Padalkar Sangli : देवाभाऊंच्या मागे बाजीप्रभुंप्रमाणे उभा राहणार

गोपीचंद पडळकर म्हणाले की, "आरक्षणाच्या बाबतीत गंभीर विषय सुरू आहे. मराठा आणि ओबीसींना एकमेकांच्या विरोध उभा करण्याचं काम सुरू आहे. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे. माझी जी काल भूमिका होती तीच आज आहे आणि उद्याही असेल. ज्यावेळी धनगरांच्या आरक्षणाचा विषय असेल त्यावेळी मी धनगरांच्या बाजूला असेन. जेव्हा देवाभाऊचा विषय असेल त्यावेळी मी देवाभाऊंच्या बाजूला बाजीप्रभुंप्रमाणे उभा असेन."

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Celebrity vs Politicians Cricket Match Video: पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
Sangli: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
Sangli ST Bus Accident : सांगलीच्या रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, दोन ते तीन जणांचा मृत्यू, प्राथमिक माहिती 
सांगलीच्या रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, दोन ते तीन जणांचा मृत्यू, 15 ते 16 जण जखमी
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget