एक्स्प्लोर

Aassudin Owasi MIM: ‘आलमगीर की भूमी एक अजीब सा सुकून है’ म्हणणाऱ्या ओवेसींच्या एमआयएमला महाराष्ट्रात नेमकं काय हवयं? मुस्लीमबहुल मतदारसंघांचं गणित कसं बदलणार?

Aassudin Owasi MIM: भाजपच्या राजकारणाला पुरक ठरणाऱ्या ओवेसींच्या एमआयएम पक्षाचा डोळा नेमका कुठे? मुस्लीम व्होटबँक गेमचेंजर कशी ठरणार? ‘बटेंगे तो कटेंगे’ या भाजपच्या घोषणेनंतर ध्रुवीकरण

Aassudin Owasi in Kolhapur: एका बाजूला अतिवृष्टी आणि पुरानं शेतकरी हैराण असतानाच कोल्हापूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या करमाडमध्ये निर्माण झालेल्या वादानंतर असदुद्दीन ओवेसी (Assdudin Owaisi) यांनी कोल्हापूरचा (Kolhapur News) दौरा केला. ते पुढे या दोन जिल्ह्यातही आवर्जून जातीलच. या निमित्ताने महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ‘एमआयएम’ला (MIM) नक्की काय साधायचे आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

कोल्हापूर आणि अहिल्यानगरमधील दौऱ्यामुळे असदुद्दीन ओवेसी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी राज्यात नव्याने पेटलेल्या आय लव्ह मोहम्मद  (I Love Mohmhamd) वादात उडी घेतली आहे. तर अहिल्यानगरमधील हिंदू मुस्लिम तणावानंतर ओवेसींचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला महाराष्ट्राने तुलनेने अधिक दिलं. ‘बटेंगे तो कटेंगे’ या  भाजपच्या घोषणेनंतर एकगठ्ठा मतदान मिळविण्यात यश आलेल्या भाजपला राजकारणात ओवीसी यांचा उपयोग होतोच. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीतून महाराष्ट्रात आलेला आलेल्या ओवेसींचा डोळा राज्यातील काही मुस्लिम बहुल भागात असेल हे नक्कीच. शहरी भागातील मुस्लिम मतांचा गठ्ठा एकत्रित करणे हे त्यांचे पूर्वीपासून लक्ष होतेच. त्यासाठी हव्या त्या पद्धतीने युक्तीवाद करणारे ओवेसी मराठवाड्यात तर भावनिक भाषण करतात.

या  राजकारणाला आधार घेण्यासाठी त्यांनी पूर्वी ‘आलमगीर की भूमी एक अजीब सा सुकून है’ असंही म्हटलं होतं. अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन शहरातील जुन्या ‘औरंगाबाद’ नावाचा पूल त्यांना उभा करायचा असावा असं म्हटलं जात आहे. यातून ते मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करतील. मुस्लिम मतपेढीच्या आधारे शहरी भागातील महापालिकांच्या निवडणुकीवर ‘ एमआयएम’ चा डोळा असेल, हे लख्खपणे दिसते आहे. निवडणुकीच्या राजकारणात भगवा आणि हिरवा हे दोनच रंग रहावेत, अशी 'एमआयएम'ची भूमिका पूर्वीही होती आणि पुढेही राहील.

MIM in Maharashtra: महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएमचा प्रवेश नक्कीच झाला तरी कसा?

महाराष्ट्रात एक खासदार दोन आमदार असलेल्या एमआयएमचे सध्या महाराष्ट्रात धुळे आणि मालेगाव या दोन मतदार संघात आमदार आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये साधारणत: 27 ते 28 नगरसेवक आपल्याच पक्षाचे असावेत, मालेगाव, धुळे, सोलापूर, नांदेड येथेही आपली ताकद वाढती ठेवण्यावर एमआयएमने भर दिला होता. बीड ,सारख्या नगरपालिकेमध्येही गेल्या निवडणुकीमध्ये ‘ एमआयएम’ चा प्रभाव दिसून आला होता. नांदेड, सोलापूर, मुंबई, पुणे या महानगरपालिकेतही एमआयएमचे नगरसेवक निवडून आले.निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मतांच्या आधारे महाराष्ट्रातील पुढील विधानसभा निवडणुकांपर्यंत आपला दबावगट कायम ठेवण्यासाठी ओवेसी सध्या प्रयत्न करतील, असे चित्र आहे. 
 
जिथे हिंदू - मुस्लिम वादाची ठिणगी पडेल तिथे ओवेसी जातील. मुस्लिम मतांच्या केंद्रीकरणाचे राजकारण हाच ओवेसी यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. ऐन अतिवृष्टीच्या संकटातही तोच आधार बनवून त्यांचे होणारे दौरे मूळ मुद्दयांना बगल देण्यासाठी आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे.

देशातील सध्याची स्थिती पाहता केवळ भाजप NDA आघाडीचा बोलबाला आहे. त्यात धर्मनिरपेक्ष मतांचे एकत्रीकरण करण्यात काँग्रेस आणि त्यांच्यासोबतची आघाडी यशस्वी ठरली नाही. तेच एमआयएमचे ओबीसी यांनी हे केलेले दिसते. त्यामुळेच ते धार्मिक मतांचे एकत्रिकरण करून आपल्या पदरात पाडून घेण्याचे डाव रचले जात आहेत. आता सध्या मैदान अनुकूल आहे आणि त्या अनुकूलतेचा फायदा एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओबीसी हे घेताना दिसत आहेत आणि त्याची सुरुवात आता महाराष्ट्रामध्ये अधिक आक्रमकपणे करताना दिसतील.

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर असदुद्दीन ओवेसींचा महाराष्ट्र प्लॅन काय?; 8 मुद्दे समजून घ्या! 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
Embed widget