Lal Krishna Advani: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, पंतप्रधान मोदींची ट्विट करत घोषणा
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर (Bharat Ratna Award) करण्यात आला आहे.
Lal krishna Adwani BharatRatna: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर (Bharat Ratna Awrad) करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली आहे. भाजप वाढवण्यात अडवाणींचा मोठा वाटा आहे.
नरेंद्र मोदींनी ट्वीट करत घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, मला सांगण्यास आनंद होतो की एल के अडवाणीजींनी भारतरत्न जाहीर झाला आहे. मी अडवाणींशी बोललो आणि त्यांचं अभिनंदन केले. अडवाणी हे या काळातील सर्वाधिक आदरणीय नेते आहेत. तळगाळातून काम सुरू करत उपपंतप्रधानपदी पोहचलेले नेतृत्व म्हणजे लालकृष्ण अडवाणी आहेत. गृहमंत्री आणि आयबी मिनिस्टर म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली.
I am very happy to share that Shri LK Advani Ji will be conferred the Bharat Ratna. I also spoke to him and congratulated him on being conferred this honour. One of the most respected statesmen of our times, his contribution to the development of India is monumental. His is a… pic.twitter.com/Ya78qjJbPK
— Narendra Modi (@narendramodi) February 3, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यामध्ये सख्य नसल्याच्या चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर अडवाणींना पुरस्कार जाहीर करून नरेंद्र मोदी हे अडवाणींना विसरले नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. लालकृष्ण अडवानींना पुरस्कार जाहीर करून भाजपने दोन गोष्टी साध्य केल्या आहेत. लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे नवे आयकॉन आहेत.
कोण आहेत लालकृष्ण अडवाणी? (Who Is Lal Krishna Advani)
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी झाला. ते भारतीय जनसंघाचे नेते होते आणि 1974 साली ते राज्यसभेवर निवडून गेले. आणिबाणीच्या कालावधीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 1977 साली जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले. 1980 साली भारतीय पक्षाची स्थापना झाली आणि लालकृष्ण अडवाणी हे त्याच्या संस्थापकांपैकी एक नेते होते. 1998 साली भाजपची सत्ता आल्यानंतर ते देशाचे गृहमंत्री झाले. तर 2002 ते 2004 या दरम्यान ते देशाचे उपपंतप्रधान बनले. 1986 ते 1990, 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 या दरम्यान ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. लालकृष्ण अडवाणी सध्या भाजपच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.