एक्स्प्लोर

कुख्यात निलेश घायवळची 10 बँक खाती पोलिसांकडून फ्रिज; आता पैसे वापरता येणार नाहीत, किती होती रक्कम?

युरोपला लंडनमध्ये पसार झालेल्या गुंड निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट नावाचा आणि बनावट पत्त्याचा उपयोग केल्याचं समोर आलं आहे.

पुणे : कोथरुड येथील फरार कुख्यात निलेश घायवळने (Nilesh ghaywal) लंडन गाठल्यानंतर पोलिसांच्या (Police) तपासाला आता गती मिळाली असून त्याने पासपोर्टवर कुठला पत्ता टाकला, पासपोर्ट जमा का केला नाही, यासह त्याच्या घरावरही धाड टाकून स्कॉर्पिओ कार जप्त केल्या आहेत. त्यानंतर, आता पोलिसांकडून निलेश घायवळची बँक खातीही फ्रिज करण्यात आली आहेत. कोथरुडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर घायवळ गँगमधील काही जणांना पोलिसांनी अटक केली असून निलेश घायवळ फरार झाला आहे. मात्र, तो थेट लंडनला पसार झाल्याचं पुणे (Pune) पोलिसांच्या तपासातून पुढे आले. त्यामुळे, आता पोलिसांकडून त्याच्या मालमत्तेवरही टाच आणली जात असून त्याची 10 बँक खातही फ्रिज केली आहेत.

युरोपला लंडनमध्ये पसार झालेल्या गुंड निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट नावाचा आणि बनावट पत्त्याचा उपयोग केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी आणि नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आश्चर्य म्हणजे पासपोर्ट मिळवण्यासाठी निलेश घायवळने दिलेल्या नगरमधील पत्त्यावर तो राहत नसल्याचं समजल्यावरही त्याला तात्काळ स्वरूपाचा पासपोर्ट देण्यात आला. याच पासपोर्टचा उपयोग करुन घायवळ 90 दिवसांचा व्हिजा मिळवून युरोपच्या टूरवर गेलाय.

सर्वसामान्यांना पासपोर्ट देताना कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करणाऱ्या पासपोर्ट कार्यालयाला आणि नगर पोलिसांना गुंड निलेश घायवळचे कॅरेक्टर मात्र खटकले नाही. घायवळवर हत्या, अपहरण, खंडणी, शस्त्रांचा वापर असे अनेक गंभीर गुन्हे नोंद असताना देखील पासपोर्ट मिळवण्यात घायवळ यशस्वी ठरला. पासपोर्टसाठी पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यलयाकडे घायवळने 23 डिसेंबर 2019 रोजी अर्ज केला. मात्र आर्जवर पुण्यातील नाही तर अहिल्यानगरचा पत्ता असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. टेक्स्ट इन गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड 414001 हा पत्ता त्याने पासपोर्टसाठी दिला आहे. हा पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळने नाव देखील बनावट वापरलं. त्यासाठी आडनावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला. Ghaywal या नावातील h काढून टाकले आणि Gaywal असं केलं आहे. आश्चर्य म्हणजे पुढील 5 वर्षे याचा पोलिसांना आणि पासपोर्ट कार्यालयाला थांगपत्ता देखील लागला नाही हे विशेष. मात्र, आता पोलीस तपासाला गती आली आहे.

10 बँक खाती सील, 38 लाख जप्त

पुणे पोलिसांनी 10 बँक अकाऊंट फ्रिज केली आहेत आणि त्यातून 38 लाख रुपये जप्त केले. कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांवर पोलिस व आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. फ्रिज करण्यात आलेली अकाउंट्स शुभांगी सचिन घायवळ, स्वाती निलेश घायवळ, कुसुम घायवळ, निलेश घायवळ (2 वेगवेगळे खाते) आणि सचिन घायवळ यांच्या नावावर आहेत. ही खाती विविध बँकांमध्ये असून त्यामध्ये जमा असलेले सर्व पैसे आता वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा

Snake Video: साप पकडणं अंगलट, जालन्यातील तरुणाचा मृत्यू; 24 वर्षीय प्राणवीनेही रुग्णालयात जीव सोडला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget