Kishori Pednekar : अरे पवार साहेबांनी तुम्हाला शेंदूर लावला नसता तर अल्पच राहिला असतात, किशोरी पेडणेकरांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
Kishori Pednekar : ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केलीये.
Kishori Pednekar on Hasan Mushrif, मुंबई : "महाविकास आघाडीचे राज्य म्हणजे गद्दराना घरी बसवणे आणि खुद्दारांना सत्तेत बसवणे. ज्या वेळेला सत्ता होती तेव्हा कशी कामे अडवली जात होती, आणि आता त्यांना आठवतंय मी अल्पसंख्यांक आहे. अरे पवार साहेबांनी तुम्हाला शेंदूर लावला नसता तर अल्पच राहिला असतात, संख्या आमच्याकडे असती", असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या किशारी पेडणेकर यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केलाय. त्या मुंबईतील सभेत बोलत होत्या.
समरजित घाटगे यांचा विजय 100 टक्के झाला समजा
शिवसेना नेते अजय चौधरी म्हणाले, समरजित घाटगे यांचा विजय 100 टक्के झाला समजा. एकदा जनतेने आशीर्वाद दिला तर त्याला थांबवायच्या ताकात कुणाकडे नाही. जेव्हा कोल्हापूरमध्ये महापूर आला राशन किट वाटप करण्यासाठी कोल्हापूरमध्ये गेलो होतो. कोल्हापूरमधले मुंबईत राहणाऱ्यांचे कुटुंबीयांनी आम्हाला सांगितले. मुंबईमध्ये शिवसेना आहे, बाळासाहेबांती शिवसेना आहे त्यामुळे मला काळजी वाटत नाही. महाराष्ट्राचे जनतेने निर्णय घेतला आहे, महाराष्ट्राची जनता तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय गप्प बसणार नाही. काही करा यंदा कागलमध्ये हत्तीला गाढायचा म्हणजे गाढायचा आहे. भ्रष्टाचार करता करता आणि केसेस होता होता भाजप सोबत गेला, अशी टीकाही चौधरी यांनी केली.
कागलमधून परिवर्तनाला सुरुवात होणार
समरजितसिंह घाटगे म्हणाले, कागलमधून परिवर्तनाला सुरुवात होणार आहे. माझ्यावर टीका टिप्पणी केली जाते. जे लोक टीका करतात त्या लोकांना टिकेमध्ये गुंतवून ठेवायचा आहे. या लोकांना उत्तर द्यायचं असेल तर विकासाच्या मॉडेलवरच उत्तर द्यायचं. मतदारसंघात असं काम करायचे की मुंबईतील लोकांना तिथे संधी मिळाली पाहिजे. गडहिंग्लज एमआयडीसी चांगली करणार आहोत. आज कागल मध्ये हॉस्पिटलचा प्रश्न आहे. मी तुमचा आशीर्वाद मागायला आलो आहे. कागलचा कोंढाणा पुन्हा जिंकायचा आहे. ही निवडणूक निष्ठा विरुद्ध निष्ठेची बोली लावणाऱ्यांच्या विरोधात आहे.
सचिन आहेर म्हणाले, निवडणूक आयोगाचे अधिकारी येऊन गेलेत, मात्र 5 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आहे.त्यामुळे निवडणूक 5-6 तारखेनंतरच होईल. राजे मुळात तुमचा पत्ता आधी चुकला होता आता तुमचा पत्ता परफेक्ट लागला आहे. अडचणीच्या काळात तुम्ही पवार साहेबांच्या सोबत उभे राहण्याचे काम केले आहे. नक्कीच हा मतदार तुमच्यामागे उभ राहिल्या शिवाय राहणार नाही. ही तुमच्या विजयाची सभा ठरणार आहे. तिकडे चहा पेक्षा किटली गरम आहे, मात्र चहा जर प्यायचा असेल तर किटली च बदलावी लागेल, असं सचिन आहेर म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या