(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics : कपिल पाटलांना दे धक्का! दोन दिवसांपूर्वी नवा पक्ष स्थापन, मात्र खंदा शिलेदार ठाकरेंच्या शिवसेनेत
Jalindar Sarode in Thackeray Group : शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे विश्वासू शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
Maharashtra Politics : कपिल पाटील (Kapil Patil) यांना मोठा धक्का बसला आहे. कपिल पाटलांच्या विश्वासू नेत्यानं हाती शिवबंधन बांधलं आहे. कपिल पाटलांनी दोन दिवसांपूर्वी नवा पक्ष स्थापन केला आणि आता त्यांचा खंद्या शिलेदाराने ठाकरेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे विश्वासू शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी मंगळवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज मातोश्रीवर जालिंदर सरोदे आपल्या समर्थक शिक्षक भारतीचे शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना ठाकरे प्रवेश केला आहे.
कपिल पाटलांना दे धक्का
शिक्षक भारतीमधील अंतर्गत नाराजी आणि मुंबई शिक्षक मतदार संघाची उमेदवारी डावल्याने जालिंदर सरोदे हे नाराज होते आणि त्यामुळेच शिक्षक भरती सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत असल्याची माहिती आहे. जालिंदर सरोदे हे मागील 18 वर्षापासून शिक्षक भारतीच्या स्थापनेपासून कार्यरत होते आणि कपिल पाटील यांचे विश्वासू म्हणून ते समजले जातात.
खंदा शिलेदार ठाकरे गटात
शिवसेना ठाकरे गटात शिवसेना शिक्षक सेनेची त्यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी जेडीला रामराम केल्यानंतर आणि समाजवादी गणराज्य पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर देखील आपलेच सहकारी हे शिवसेना ठाकरे गटासोबत जात आहेत.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मातोश्रीवर सरोदे यांचा पक्षप्रवेश झाला यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जालिंदर सर तुम्ही शिक्षक सेना पुरतेच काम नाही तर, शिवसेनामध्ये सुद्धा काम करणार आहात. तुम्ही शिक्षक आहात राजकारणात सुसंकृतपणा आणण्याची गरज आहे. शिक्षक म्हटल्यानंतर विद्यार्थी ऐकणार नाही असं होत नाही. वेळेप्रसंगी तुम्ही छडी सुद्धा हातात घ्यावी लागेल. आज तुम्ही सत्ता आणण्यासाठी माझ्यासोबत आला आहात. सुजाण राज्य करण्यासाठी तुमचा उपयोग करायचा आहे.
योग्य वेळी शिवसेनेत येण्याचा निर्णय
तुम्ही शाळेत मेहनत करुन भावी पिढी तयार करता, भावी पिढी नासणार असेल आणि नासक्या-कुसक्या लोकांच्या हाती जाणार असेल, तर आपल्या शिक्षणाचा फायदा काय तुम्ही योग्य वेळी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. सध्या फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :