एक्स्प्लोर

Ajit Pawar: पत्नीच्या पराभवानंतर अजितदादांचा पहिला मोठा निर्णय, पहिला झटका युगेंद्र पवारांना!

Maharashtra Politics: बारामतीध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव होताच अजित पवारांनी डाव टाकला. युगेंद्र पवारांना धक्का.माझ्या कानावर काही गोष्टी आल्या पण ऑफिशयल माझ्यापर्यंत काही आलं नाही, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले.

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या सांगण्यावरुन बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ⁠बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपस्थित न राहिल्याचे कारण कुस्तीगीर परिषदेकडून पुढे करण्यात आले आहे. यावर आता युगेंद्र पवार आणि शरद पवार गट (Sharad Pawar camp) काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

दरम्यान, युगेंद्र पवार यांनी आपल्याला या निर्णयाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. अध्यक्षपदावरून हटवण्याच्या बाबतीत मला अधिकृत अद्याप काही कळवण्यात आलेले नाही किंवा मला तसे काही पत्र प्राप्त झालेले नाही. मात्र, कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये काहीतरी निर्णय झाल्याची माहिती आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच युगेंद्र पवार यांची बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन उचल बांगडी केल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील वाद पुढच्या टप्प्यावर पोहोचला असल्याची चर्चा आहे. बारामती लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी माळेगाव येथील अजित पवारांच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी अजितदादा घरात नव्हते. मात्र, सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची भेट घेतली होती. या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी लोकसभा प्रचारादरम्यान पवार कुटुंबात निर्माण झालेली कटुता कमी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता अजित पवार यांनी युगेंद्र पवारांना कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन हटवल्याने हा वाद चिघळणार का, हे पाहावे लागेल.

बारामतीत शरद पवारांचा डंका

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. सुप्रिया सुळे यांनी तब्बल १ लाख ५८ हजारांच्या मताधिक्याने सुनेत्रा पवार यांना हरवले होते. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली होती. यामध्ये बारामती, इंदापूर, खडकवासला आणि बारामती विधानसभाक्षेत्राचा समावेश होता. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार यांनी लोकसभेच्या एकूण चार जागा लढवल्या होत्या. यापैकी केवळ रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे निवडून आले होते. 

आणखी वाचा

अजित पवारांच्या विधानसभा मतदारसंघातच सुनेत्रा पवारांचा घात, सहापैकी 5 ठिकाणी सुप्रिया सुळेंना साथ, कुणाला किती मतं?

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Embed widget