एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : मला सरकारमधून मोकळं करा; देवेंद्र फडणवीसांच्या स्फोटक पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. 48 जागांपेकी फक्त 9 जागा भाजपने मिळवल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवला मी जबाबदार असल्याचं फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis Ready To Resign
1/10

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवलं.
2/10

2019 च्या निवडणुकीत 22 जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला यावेळी फक्त 9 जागांवरच विजय मिळवता आला.
3/10

लोकसभा निवडणुकीत राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही, अशी कबुली देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
4/10

राज्यात अपेक्षापेक्षा खूप कमी जागा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. मला सरकारमधून मोकळं करा आणि विधानसभेसाठी तयारी करण्यासाठी वेळ द्या, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं फडणवीस म्हणाले.
5/10

महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होतीच, त्यासोबतच नरेटिव्हसोबत करावी लागली, असं फडणवीस म्हणाले.
6/10

विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याचा प्रचार जोरात केला गेला, त्याचा आम्हाला फटका बसल्याचं फडणवीस म्हणाले.
7/10

शेतकऱ्यांचा कांद्याचा मुद्दा महत्वाचा राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन- कापूस याचे दर कमी झाल्याचं फडणवीसांनी म्हटलं.
8/10

भाजपला राज्यात लोकांनी नाकारलं अशी परिस्थिती नाही, तर सम-समान मतं मिळाली आहेत, असं फडणवीस पुढे म्हणाले.
9/10

राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो आणि ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचं अभिनंदन करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
10/10

इंडिया आघाडी तयार झाली होती, त्या संपूर्ण इंडिया आघाडीला जितक्या जागा मिळाल्या. त्यापेक्षा जास्त जागा भाजपला देशात मिळाल्या आहेत, असंही ते म्हणाले.
Published at : 05 Jun 2024 03:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















