एक्स्प्लोर

ईडी, आयटी दोन नंबरचे व्यवहार करणाऱ्यांना मोकाट सोडून, राजकारण्यांच्या मागे लागलेत, जयंत पाटलांचा आरोप

ईडी, आयटी दोन नंबरचे व्यवहार करणाऱ्यांना मोकाट सोडून, राजकारण्यांच्या मागे लागला असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

वसई : ईडी, आयटी या यंत्रणांनी देशातील दोन नंबरचे व्यवहार करणारे, काळाबाजार करणाऱ्यांच्या मागे लागून केंद्र सरकारचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. मात्र, या संस्था अशा लोकांना मोकाट सोडून, राजकारण्यांची 10 ते 15 वर्षापूर्वीची प्रकरणे बाहेर काढून त्यावर बोट ठेवण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लोकप्रतिनीधींशी उद्धट बोलणाऱ्या पोलीस अधिकारी शेखर बागडेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज वसईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या दोघां नेत्यांनी आरोप केले आहे.  

विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा आज संपूर्ण दिवसभरासाठी वसई विरार आणि पालघर दौरा होता. या दौऱ्यात नालासोपारा आणि वसई विधानसभेतील कार्यकर्त्यांची आढावा बैठकही घेतली गेली. यावेळी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी ईडी आणि आयटी यांच्यावर आरोप करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडीला नामोहरम करण्यासाठी, सरकार पडत नाही म्हटल्यावर बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब भाजप करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.   

अलिकडच्या काळात प्रत्येकावर धाडसत्र टाकण्याचा प्रयत्न केलं जातोयं. ईडी, आयटी यांनी केंद्र सरकारचं उत्पन्न वाढवण्यासाठी देशातील दोन नंबरचा व्यवहार करणारे, काळाबाजार करणारे, ज्याच्यांकडे अवैद्य संपती आहे. अशा लोकांच्या मागे लागले पाहिजे. मात्र, अलिकडे या संस्था राजकारण्यांच्या मागे लागल्या आहेत. अवैद्य व्यवसाय करणारी लोक मोकाट स्वैराचार करण्याला परवानगी आहे. तर राजकाणात 10 ते 15 वर्षापूर्वीची प्रकरण काढून, त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सरकार स्थिर आहे. भाजपाचे कार्यकर्ते सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षात प्रवेश करत आहेत. तिन्ही पक्ष बळकट होणार आहे. त्यामुळेच भाजप टोकाचे प्रयत्न आणि आरोप करतेय असा आरोप पाटील यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात होवू घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीत एकत्र लढण्यावर राष्ट्रवादीचा भर असेल असे संकेत पाटील यांनी दिले आहेत. जेथे शक्य आहे तेथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे संकेत पाटील यांनी दिले आहेत. आजचा परिवार संवाद दौरा आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेतले गेले. पक्ष वाढीसाठी काय करता येईल याची चाचपणी केल्याच पाटील यांनी म्हटलं आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र अव्हाड यांनी आज ट्विटद्वारे आरोप केलेल्या पोलीस अधिकाऱ्याविषयी गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षात असताना शेखर बागडे या पोलीस अधिकाऱ्याची वागणूक अत्यंत उद्धटपणाची होती. कुणीही लोकप्रतिनीधीची कॉलर पकडून त्याचा अपमान करतो. आर्थिक गुन्हे शाखेला बदली झाल्यावरही बिल्डरांकडून कार्यालयात बोलवून, हप्ते घेतल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केलाय. त्याचबरोबर त्यांची बेनामी संपती असल्याचही आरोप आव्हाड यांनी केलायं. आता परत ठाण्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यात रुजू होण्यासाठी बागडे प्रयत्न करत असल्याचा आरोप केलायं. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनीधी बद्दल जर आदर नसेल तर असा अधिकारी व्यवस्थेचा भाग होवू शकत नाही. त्याला बाजूला बसवण्याची मागणी महाराष्ट्राचे पोलीस महानिरीक्षकांना केल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. बागडे माझ्याशी उद्धट बोलला. आणि माझ्याशी उद्धट बोलण्याचं संभाषण रेकॉर्ड केल्याचाही आरोप आव्हाड यांनी केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Embed widget