फाईली मंजूर होईनात, एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे तक्रार; पुण्यातील बैठकीत निशाण्यावर अजित दादा
अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात काल पुण्यात झाली बैठक झाली होती. या बैठकीत निधी वाटपावरून झालेल्या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुंबई : महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होत असते. तर, विरोधकांकडूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) नाराज असल्याचं वारंवार सांगितलं जातं. महायुतीमधील (Mahayuti) अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन वाद सुरू आहे. तर, दुसरीकडे एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून निधी मिळत नसल्याचे, तसेच फाईली अडवून ठेवण्यात येत असल्याची सांगत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अजित पवारांच्या खात्याबद्दल थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे, गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्यातच, एकनाथ शिंदे यांनी पुण्यात अमित शाह (Amit shah) यांची भेट घेऊन आपली नाराजी उघड केली. यावेळी, शिवसेना आमदारांना निधी वाटप करताना दुजाभाव केला जात असल्याची तक्रारही त्यांनी केल्याचे समजते. त्यामुळे, महायुतीमधील शीतयुद्ध आता दिल्ली दरबारी गृहमंत्र्यांच्या कानावर पोहोचल्याचं दिसून येतं.
अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात काल पुण्यात झाली बैठक झाली होती. या बैठकीत निधी वाटपावरून झालेल्या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल वेटिंगवर ठेवल्या जात असल्याची बाब शिंदे यांनी शहांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या विकासकामात अडथळा निर्माण होत असल्याचे देखील शिंदेंनी सांगितले. जर महायुतीत आहोत तर निधी वाटप आणि फाईल क्लिअरन्स एकसमान झाले पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे.
विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार अर्थ खात्याने अपुरा निधी दिल्याने रखडले होते, शेवटी एकनाथ शिंदे यांना स्वतः वित्त सचिवांना कॉल करून मध्यस्थी करावी लागली होती, त्यामुळे महायुतीमधील शीतयुद्ध राष्ट्रवादी-शिवसेनेतील कुरघोडी उघड झाली होती. आता, थेट भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंकडून अमित शाहांवर स्तुतीसुमने
देशाचे गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावरती आले असून छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे. त्यामुळे अमित शाह यांनी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं. यावेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना अमित शाह यांचं कौतुक केलं. मोदी सरकारने कलम 370 हटवले, वक्क्फ बोर्डाच्या विधेयकावेळी केलेलं भाषण अंगावर शहारे आणणारे होते. सीमेवरील शत्रू बिळात बसले आहेत, कारण अमित शाह आणि मोदीजींमुळे, देशामध्ये हिंसा पसरवणारे लोक, दहशतवादी असतील अतिरेकी असतील त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम त्याचबरोबर 26/11 चा मास्टरमाईंड राणाला दिल्लीत मुंबईत आणलं जाईल आणि फासावर चढवलं जाईल. ही कामगारी आपल्या प्रधानमंत्र्यांची आणि गृहमंत्र्यांची आहे. यावेळी शिंदेंनी एक शेर म्हणत अमित शाहांचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा
अनेकांचे whatasapp डाऊन, मेसेज जाईना, स्टेटसही अपलोड होईना !
























