एक्स्प्लोर

Maratha Reservation Devendra Fadnavis: आरक्षणाचे जनक... देवेंद्र बाहुबली! सुरेश धसांच्या मतदारसंघातील बॅनर्सने चर्चांना उधाण

Maratha Reservation Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात पाच दिवस ठाण मांडून बसले होते. अखेर सरकारने जीआर काढला होता.

Maratha Reservation Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलक मुंबईत आल्यानंतर महायुती सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नवीन शासन आदेश काढला होता. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपकडून (BJP) मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्याचा पुरेपूर प्रयत्न होताना दिसत आहे. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात मराठा आरक्षणाच्यादृष्टीने (Maratha Reservation) महत्त्वाची पावले कशी उचलली गेली, याचा प्रचार भाजप समर्थकांकडून केला जात होता. कालच राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीला वंदन करतानाचा फोटो असलेल्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे शिल्पकार असल्याची बाब अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाला होता. यानंतर आता बीडमध्येही देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर्स लागल्याची माहिती समोर आली आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकत आहे. 'लढाई जिंकली बरं का... देवेंद्र बाहुबली, आरक्षणाचे जनक...' असा मजकूर या बॅनर्सवर लिहण्यात आला आहे. आष्टी तालुक्यातील देवी निमगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवरील मजकूर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट्सह इतर मागण्या मान्य केल्या. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले जात आहेत.

Rohit Pawar: भाजपच्या जाहिरातबाजीवर रोहित पवारांची टीका

अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'देवाभाऊ' अशा मथळ्याखाली राज्यातील सर्वच प्रमुख दैनिकांमध्ये मोठमोठ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. पहिल्या आणि दुसऱ्या पानावर या जाहिराती झळकल्या होत्या. या जाहिरातींमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मोठा होता. राजकीय वर्तुळात या जाहिरातीची प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र, ही जाहिरात नेमकी कोणाकडून देण्यात आली, असा प्रश्न अनेकांना पडला होता. याबाबत आमदार रोहित पवार यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणाचे शिल्पकार म्हणून ब्रँडिंग करणारी ही जाहिरात भाजप नव्हे तर मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने दिली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर या जाहिराती दिल्या, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा

ठाण्यात देवेंद्र फडणवीस यांचे 'देवा भाऊ' म्हणून झळकले बॅनर; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्येच श्रेय वादाची लढाई?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 

व्हिडीओ

Sanjay Raut Shiv sena : गिरीश महाजन स्वतः ला बाहुबली समजतात, राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? कृष्णराज महाडिक म्हणाले..
Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी
Vijay Wadettiwar Mumbai : मनसेसोबत आघाडी करणार का? विजय वडेट्टीवार थेटच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
Aravali Hills: लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतेज पाटलांना अल्टिमेटम
Video: कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतेज पाटलांना अल्टिमेटम
Embed widget