एक्स्प्लोर

Rohit Pawar: काळ्या काचेच्या गाडीतून पाठवणी; व्ही, के, सिंगला नाश्ता, जेवण, रात्री एक तास मॅच पाहू दिली, रोहित पवारांचा संताप

Rohit Pawar: आधी एफआयआर तर होऊ द्या, जर दिल्लीत जाऊन काही मोठ्या नेत्यांसोबत बोलून पाठपुरावा केला तर, नक्कीच फायदा होईल, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये  झालेल्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) ज्या विमानातून प्रवास करत होते त्या व्हीएसआर कंपनीवरती आरोप करत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या कंपनीविरोधात मोठ्या प्रमाणावर टीका केली. या पार्श्वभूमीवर  काल (गुरुवारी, ता ५) व्हीएसआर कंपनीचे मालक आर.के. सिंग यांना सीआयडीने (CID) चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार काल आर.के. सिंह हे पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात हजर झाले होते. काही तास चौकशी करुन त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, आता आमदार रोहित पवार यांनी आज (शुक्रवारी, ता, ६) सोशल मिडीयावरती पोस्ट करुन सीआयडीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी आलेल्या आर.के. सिंह यांना एखाद्या पाहुण्यासारखी वागणूक दिली, असे रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Maharashtra Politics news) त्यानंतर आता माध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत, व्ही.के. सिंग हा पोलिसांना भेटायला आला होता. तेव्हा त्याला क्रिकेटची मॅच सुद्धा पाहायला दिली, पोलीस स्टेशनमध्ये दाखवली अशी माहिती आहे, पोलिसांनी त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली आहे, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. 

राष्ट्रवादी पक्षाने जास्त ताकद लावायला हवी कारण ते सत्तेत आहेत, त्यांनी आणखी जास्त ताकद लावली पाहिजे, आपल्याला यामुळे दादांना नक्कीच न्याय देता येईल. राजकारणाशी ज्यांचं काही घेणं देणं नाही ते सुद्धा आवाज उठवला पाहिजे. अजित दादा यांना न्याय मिळेल. २०१९ ला विमान अपघात घाटकोपरला झाला होता, तोही विमान अपघातच होता, पण तिथे किरीट सोमय्या गेल्यानंतर तेव्हा गुन्हा दाखल झाला. त्या एफआयआरमध्ये आणि या एफआयआरमध्ये काहीच फरक नाहीये, जर अजित दादांच्या मृत्यूबाबतचा एफआयआर पोलिस प्रशासन घेत नसेल तर मग याला आपण काय म्हणाणार, सत्तेत आहेत, त्यांनी याबाबत थोडी ताकद लावून सगळं केलं पाहिजे, पण आधी एफआयआर तर होऊद्या, जर दिल्लीत जाऊन काही मोठ्या नेत्यांसोबत बोलून पाठपुरावा केला तर, नक्कीच फायदा होईल, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे,

काल पाहा व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही.के. सिंग हा सीआयडीला भेटण्यासाठी आला होता, पोलिसांना भेटायला आलेल्या या माणसासोबत बंदूकधारी सिक्युरिटी होती, अकरा ते आडे अकरा वाजता सिंग सीआयडी कार्यालयात आल्याचं आम्हाला समजलं, नाष्ट्यापासून जेवणापर्यंत आणि आम्हाला कळलं की, संध्याकाळी अर्धा एक तास क्रिकेटची मॅच सुद्धा त्यांना पोलीसस्टेशन मध्ये टिव्हीवरती दाखवली अशी माहिती आहे. येतानाच फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कोणत्या गाडीत गेले, ते लोकांना कळलं नाही, मिडीयाशी आणि तिथे असलेल्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर इतकंच कळलं, काळाबाजार करणाऱ्या या व्ही, के, सिंगला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काचा काळ्या असलेल्या गाडीतून नेण्यात आलं. पोलिसांनी त्याला इतकी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली आहे, एका तपासामध्ये असलेल्या प्रमुख क्रिमीनल असलेल्या या अंगाने तपास करणाऱ्याला अशी वागणूक मिळणार म्हणजे फारच दु:ख आहे, आज चार  वाजता सीआयडी (CID)ला जाणार आहे. रिपोर्ट आल्यानंतर आम्ही एफआयआर (FIR) करू असे ते म्हणाले होते आत्ता बघू , त्यांना विचारा हा संशय घ्यायला वेळ का लागला, जेवढा उशीर होईल तेवढे कागदपत्रे रंगवले जातील, CBI कडे प्रस्ताव पाठवला अन् म्हणतात २२ दिवस झाले तरी अजून काहीच झालं नाही,  

व्ही.के. सिंगला वाचवलं जात आहे, मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांना बहरीनला जाताना व्ही.के. सिंगचं विमान होतं, तेव्हा मोठा गोंधळ झाला होता. व्ही.के. सिंगला वाचवण्याचा मागे अनेक मोठे हात आहेत, त्याच्यामागे मोठे नेते आहेत, मात्र या चिरकूटला वाचविण्यासाठी अजित दादांना न्याय मिळत नाहीये, असं म्हणत रोहित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. तर पार्थ पवार नरेंद्र मोदी यांना भेटणार असतील तर त्यांना खासदार झाल्यावरचं भेटता येत असा नाही. ते सरकारमध्ये आहेत ते कधीही भेटू शकतात, भेटता येऊ शकतं असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

राणेंची टीका अन् रोहित पवारांचं उत्तर

रोहित पवार हे एव्हीगेशन एक्सपोर्ट झाले आहेत. कारण तुमची माहिती फॉर्मल ॲथोरिटीकडे द्या, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच देशाचा कायदा रोहित पवारांना माहिती आहे आणि आता ते फक्त पायलट बनायचे बाकी आहेत, असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला आहे, त्यावरती उत्तर देताना रोहित पवारांनी म्हटलं की, घातपात करणाऱ्या लोकांपासून तुम्ही सावध राहा आणि मी त्यांना सांगेन VSR विमानातून तुम्ही प्रवास करू नका. मी पायलटच होणार होतो.अन् जर मी पायलट झालो तर नक्कीच तुम्हाला मी विमानात घेऊन जाईल पण तुमच्या सोबत घातपात होणार नाही याचा विश्वास देईल.माझ्या पायलट होण्याची चिंता तुम्ही करू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
Shivendra Raje Bhosale on Eknath Shinde: सातारा जिल्हा परिषदेत भाजपला 28 जागांचे बहुमत; पण शिवसेना, राष्ट्रवादीकडून जाणूनबुजून...; एकनाथ शिंदेंच्या 'त्या' इशाऱ्याला शिवेंद्रराजेंचं प्रत्युत्तर
सातारा जिल्हा परिषदेत भाजपला 28 जागांचे बहुमत; पण शिवसेना, राष्ट्रवादीकडून जाणूनबुजून...; एकनाथ शिंदेंच्या 'त्या' इशाऱ्याला शिवेंद्रराजेंचं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis and Krishnaraaj Mahadik: फडणवीस साहेब, तुम्ही माझं नालंदा विद्यापीठ आहात, तुमच्यासोबत राहिलो तर मला कोणीही अडवू शकत नाही: कृष्णराज महाडिक
फडणवीस साहेब, तुम्ही माझं नालंदा विद्यापीठ आहात, तुमच्यासोबत राहिलो तर मला कोणीही अडवू शकत नाही: कृष्णराज महाडिक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Raja Shivaji Movie: राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
Pahalgam Attack Adil Shah House Eknath Shinde: पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
Nanded Crime News: मोबाईलच्या स्टेटसवरुन पोलिसांना 'कबुतरा'चा माग काढला, नांदेडच्या अर्जितसिंह चव्हाणचा मारेकरी शाहरुखला अटक, बड्या राजकारण्यांशी कनेक्शन
मोबाईलच्या स्टेटसवरुन पोलिसांना 'कबुतरा'चा माग काढला, नांदेडच्या अर्जितसिंह चव्हाणचा मारेकरी शाहरुखला अटक, बड्या राजकारण्यांशी कनेक्शन
Embed widget