एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचं परभणी राड्यावर विधानसभेत भाष्य, म्हणाले, बाबासाहेबांना हे अपेक्षित नाही, विरोधकांनी राजकारण करू नये!

Maharashtra Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाना पटोले यांनी परभणी आणि बीडच्या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य केले.

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी झाला. यात 39  आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आजपासून पहिले हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) सुरु झाले आहे. पहिल्याच दिवशी विधानसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी परभणी आणि बीडच्या प्रकरणावर सरकारवर निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत परभणी राडा आणि बीडच्या घटनेवर भाष्य केले आहे.  

काही दिवसांपूर्वी परभणी रेल्वे स्थानकाबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका मनोरुग्णाने केली होती. या घटनेनंतर परभणीत हिंसाचार उफाळल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले होते. यातील सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. तर बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आले. या घटनेचे पडसाद बीडमध्ये उमटले. या दोन्ही प्रकरणावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली. 

सरकारने भूमिका मांडावी : नाना पटोले

नाना पटोले म्हणाले की, परभणी आणि बीडमध्ये झालेल्या घटना या सरकार अस्तित्वात आल्यानंतर घडल्या आहेत. काल परभणीमध्ये आंबेडकरी विचारांची चळवळ लढणारा कार्यकर्ता मृत्युमुखी पडला, असे त्यांनी म्हटले. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात सदन प्रस्ताव आणि सूचना माझ्याकडे आलेल्या आहेत. त्या संदर्भातला निर्णय मी देईल. मी निर्णय दिल्यानंतर आपण यावर बोलू, असे म्हटले. यानंतर नाना पटोले म्हणाले की, सरकार अस्तित्वात आल्यानंतर या घटना घडलेल्या आहेत. आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेमुळे पूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे.  विधानसभा अध्यक्ष आपल्या माध्यमातूनच आम्हाला न्याय मिळू शकतो. राज्यातील जनतेला न्याय मिळू शकतो. सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे राज्यात लोकांमध्ये तीव्र चिड निर्माण झाली आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करत आहे सरकारने त्यांची भूमिका मांडावी, असे त्यांनी यावेळी म्हटले. 

विरोधकांनी राजकारण करू नये! 

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारची यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची तयारी आहे. विधानसभा अध्यक्षांनी उद्याचा निवास नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही. यासंदर्भात सविस्तर चर्चा आम्ही करू. दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत त्यामुळे निश्चितपणे त्यावर चर्चा करून त्यावर सरकारने काय कारवाई केली, हे आपण सांगू. विशेषतः परभणीच्या घटनेसंदर्भात मला आवाहन करायचे आहे की, संविधानाचा अपमान कोणीच सहन करणार नाही. ज्यांनी अपमान केला तो मनोरुग्ण आहे. मनोरुग्णाने अपमान केल्यानंतर त्याच्यावर कारवाई झालेली आहे. तिथे संतापाची लाट पसरली, काही गोष्टी घडल्या, मात्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला हे अपेक्षित नाही. विधानसभा अध्यक्ष ज्यावेळी वेळ राखून देतील. त्यावेळी यावर सविस्तर चर्चा करून त्यावर योग्य उपाय योजना आपण करू. विरोधी पक्ष देखील याचे राजकारण न करता आपल्या राज्यात कायदा-सुव्यवस्था कशी अबाधित राहिला, अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, याबाबत चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sadabhau Khot : आमची वेळ आली तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले, सदाभाऊ खोतांची मंत्रिपद न मिळाल्यानं खंत

Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखी एकजण ताब्यात, पोलिसांकडून तपासाला वेगABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
Embed widget