एक्स्प्लोर

Sadabhau Khot : आमची वेळ आली तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले, सदाभाऊ खोतांची मंत्रिपद न मिळाल्यानं खंत

Sadabhau Khot : विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यानं खंत व्यक्त केली आहे. अडीच वर्षांनी संधी मिळते का ते पाहावं लागेल, असंही ते म्हणाले.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल नागपूरमध्ये पार पडला. यानंतर भाजप, शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये अन् त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय भाजपचे मित्र पक्षांमध्ये देखील नाराजीचं वातावरण आहे. प्रथम केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा देखील नाराज असल्याचं समोर आलं आहे. आता विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. नांगरणीसाठी जी बैल वापरली गेली ती बैल बाजूला करुन ठेवली असल्याची खंत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे. 

मित्रपक्षांना तिन्ही पक्षांनी सामावून घेणं गरजेचं होतं. तीन पक्षांनी मित्रपक्षांसाठी काही मंत्रिपदं बाजूला काढून ठेवायला हवी होती. परंतु, दुर्दैवानं तसं झालं नाही.गावगाड्यामध्ये पैरा केला जातो, त्याप्रमाणं दुर्दैवानं काही झालं की आम्ही तीन पक्षांचं शेत नागंरुन दिलं. मात्र, आमचं शेत नांगरायची वेळ आली तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले. आम्ही मात्र शेतात उभे आहोत. मात्र, प्रामाणिकपणे महायुतीसोबत उभे आहोत, असं सदाभाऊ खोत म्हणाले. 

240 लोक आपले निवडून आले आहेत, मंत्रिपदं देण्याला काही मर्यादा होत्या, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, कालांतरानं ही सगळी मंडळी कामात येतील. शेतकरी एखाद्या वर्षी शेत पिकलं नाही म्हणून पेरणी करायचं थांबत नाही.दुसऱ्या वर्षी पेरणी होतीय का हे बघत राहायचं, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं. सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना भाजपनं विधानपरिषदेवर संधी दिली होती. 

भाजपच्या मित्रपक्षांमध्ये नाराजी

भाजपची काल मंत्रिमंडळ विस्तारासाठी आमदारांची नावं जाहीर झाल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती. रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आरपीआयला एक मंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता. मात्र, त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचं आमंत्रण देखील देण्यात आलं नाही, असं रामदास आठवले म्हणाले. 

रवी राणांची देखील नाराजी

युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा देखील नाराज असल्याचं समोर आलं आहे. ते अधिवेशन सोडून अमरावतीला परतल्याची माहिती आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत देखील मंत्रिपद न मिळाल्यानं खदखद पाहायला मिळाली. नरेंद्र भोंडेकर यांनी वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, असं म्हटलं. प्रकाश सुर्वे यांची नाराजी देखील लपून राहिली नाही. तानाजी सावंत देखील नाराज असल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्यांच्या कार्यालयानं तानाजी सावंत आरोग्याच्या कारणामुळं नागपूरहून निघाल्याचं म्हटलं. 

इतर बातम्या :

मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेच्या आमदारांची आदळआपट; एकनाथ शिंदे नाराज, कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत!

नागपूरहून काल बॅग घेऊन निघाले, तानाजी सावंत कुठे गेले?, नाराजीच्या चर्चांवरही मोठी माहिती समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
Temperature Alert: बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Dshmukh Nagpur : कर्जमाफीच्या आश्वासनाप्रमाणे अधिवेशनातच घोषणा करा - अनिल देशमुख9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 16 डिसेंबर 2024: ABP MAJHADCM Eknath Shinde : श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात मंत्रिपदंNagpur Banners : विधान भवनाबाहेर नेत्यांना शुभेच्छा देणारे मोठ मोठे बॅनर्स लावले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
Temperature Alert: बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
Parbhani Band: सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
Mumbai Crime News: फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
Embed widget