काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतली युवक कांग्रेसच्या पदमुक्त पदाधिकाऱ्यांची दखल; शिवराज मोरेंची प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती
Nagpur News : काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पदमुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत आता उपाध्यक्ष असलेले शिवराज मोरे यांची प्रदेश संघटनेच्या कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
Nagpur News : गेल्या आठवड्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस यासह सुमारे 60 विविध पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातील आंदोलनात दांडी मारल्यानंतर दिलेली जबाबदारी पार पाडली जात नसल्याचा आरोप ठेवत या पदाधिकाऱ्यांना पद मुक्त करण्यात आले होते.
दरम्यान, त्यानंतर पदमुक्त करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितरीत्या दिल्ली दरबारी कुणाल राऊत यांची तक्रार करत ते हुकूमशाही पद्धतीने संघटना चालवत असल्याचा आरोप केला होता. अशातच पक्षाचे पक्षश्रेष्ठींनी आणि वरिष्ठांनी पदमुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत आता उपाध्यक्ष असलेले शिवराज मोरे यांची प्रदेश संघटनेच्या कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
शिवराज मोरेंची प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातील आंदोलनात दांडी मारल्यानंतर युवक कांग्रेसच्या पदमुक्त पदाधिकाऱ्यांनी कुणाल राऊत यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत अनेक आरोप केले होते. दरम्यान गेले तीन वर्ष कुणाल राऊत अध्यक्ष आहे आणि ते कोणतीही पूर्वसूचना न देता अनेक वेळेला पदाधिकाऱ्यांवर मध्यरात्री कारवाई करतात आणि सकाळी अचानक जेव्हा त्यांना जाग येते, तेव्हा ते कारवाई मागे घेतात. गेले तीन वर्ष आम्ही अशीच मध्यरात्रीची कारवाई पाहत असल्याचे धक्कादायक आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यानंतर या बाबतची तक्रारही काँग्रेसच्या उच्च पदस्थ पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहवचवली. अशातच या तक्रारीची दखल घेण्यात आली असून शिवराज मोरेंची प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सरसंघचालकांविरोधात आंदोलनात गैरहजार राहिल्याचा ठपका ठेवत कारवाई
'अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा देश खऱ्या अर्थाने मुक्त झाला' या सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात नागपुरात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्र घेत आंदोलन पुकारले होते. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब यांच्या नेतृत्वात नागपूरातील देवडिया काँग्रेस भवनमधून निघून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संघ मुख्यालयाच्या दिशेने निघाले. मात्र विनापरवानगी करण्यात येणाऱ्या या आंदोलनाला आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संघ मुख्यालयाच्या दिशेने जाण्यापासून पोलिसांनी मध्येच रोखले. असे असताना अनेकांनी या आंदोलनाला दांडी मारली होती. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील सुमारे 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने त्यांच्या जबाबदारी पासून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
हे ही वाचा