Maha Kumbha 2025 | Aghori Sadhu | कसे बनतात अघोरी साधू? काय असते दिनचर्या?
Maha Kumbha 2025 | Aghori Sadhu | कसे बनतात अघोरी साधू? काय असते दिनचर्या?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
अघोरी संप्रदायाच्या साधूंबद्दल सामान्य लोकांना मोठं कुतुहल आहे. शैव धर्मातही हा एक तांत्रिक संप्रदाय आहे. अघोरी साधू शिवाचे भक्त असतात आणि शिवाच्या विकराल अर्थात भैरव रूपातली आराधना करतात. महाकुंभमध्ये आलेल्या अघोरी साधूंवरचा हा विशेष रिपोर्ट बघूया. यज्ञ पेटलेला आहे. यज्ञात आहुती दिली जातीय. संविधान. शाकल्य आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली घोर ते अघोर अशी यात्रा महाकुंभ मध्ये सुरू आहे. अघोर साधनेचा हा मार्ग जगाच्या कुतुहलाचा विषय आहे. हे अघोरी कोण आहेत याची सगळ्यांनाच उत्कंठा असते. या अघोरींची पूजा पद्धती असते कशी? अघोरी बनण्यासाठी नियम आणि नेमके मार्ग काय आहेत? खरं तर अघोरी लोक आपलं तप निर्जनस्थळी करत असतात पण महाकुंभच महात्म्याच अस आहे.