Nana Patole : मी पद सोडलं असून पक्षश्रेष्ठींनी सांगितलंय मला मुक्त करा; नवा प्रदेशाध्यक्षपदाबाबत नाना पटोले स्पष्टच बोलले
Nana Patole : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले पायउतार होणार असल्याच्या अनेक चर्चा पुढे आल्या असतांना नाना पटोले यांनी स्वत: यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलंय.
Nana Patole नागपूर : राज्यात पर पडेलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश आल्याचे बघायला मिळाले. तर त्यात काँग्रेसने राज्यात परत मोठी मुसंडी मारत सर्वात मोठा पक्ष ठरला. किंबहुना त्याचे श्रेय हे काही अंशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनाही दिलं गेलं. मात्र हेच चित्र विधानसभा निवडणुकीत पलटले असून महायुतीसह भाजपने कधी नव्हे ते अभूतपूर्व यश संपादन केलं. तर दुसरीकडे काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना दारुण पराभवाला समोर जावे लागलंय. दरम्यान, आगामी स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले पायउतार होणार असल्याच्या अनेक चर्चा पुढे आल्या असतांना नाना पटोले यांनी स्वत: यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलं आहे. मी पद सोडलेलं आहे, मी हाय कामंडला ही सांगितले आहे की मला मुक्त करा. अशा शब्दात नाना पटोलेंनी भाष्य केलंय.
काँग्रेस विचाराने या देशाला उभं केलंय
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस विचाराने या देशाला उभे केले आहे. ज्यावेळी स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली तेंव्हा देश उभा झाला. आम्ही स्मार्ट आहोत, ज्या लोकांना लोकशाही वाचवायची आहे त्यांनी सोबत यावे. आज त्यांची वेळ आहे उद्या आमची येईल. मात्र हे केवळ फोटो सेशनसाठी नाही, तर आपल्या राज्याची लोकसंख्या नाही त्यापेक्षा जास्त मतदार आहेत,असे म्हणत नाना पटोले यांनी मतदार यादीवर संशय घेतला आहे. भंडारा आयुध निर्मानी मध्ये स्फोट झाला, त्या कारखान्यात अरडीएक्स तयार होतं. त्यात अपरेंटिस पाठवले जातात. मात्र त्या ठिकाणी 60 वर्षाचे यंत्र आहेत, ही अलीकडची दुसरी घटना असल्याचे सांगत पटोले यांनी भंडाऱ्याच्या दुर्घटनेवरही भाष्य केलंय.
महाराष्ट्राला दारूचे राष्ट्र बनवायचे आहे का?
दुसरीकडे बॉण्ड बद्दल कोर्टाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मात्र त्यांची गेंड्याची कातडी आहे. सोयाबीनची खरेदी बंद झाली, पाऊस खरेदी बंद, तुरीचे इम्पोर्ट केलंय त्यामुळे किंमत पाडली आहे. दाओस मध्ये जाऊन गुंतवणूक आणण्याची गरज नव्हती. काही कंपनी विदेशी असल्या तरी इतर सर्व इकडच्याच होत्या. तसेच बिअर आणि दारू बनवणाऱ्या कंपन्या राज्यात आणल्या. महाराष्ट्राला दारूचे राष्ट्र बनवायचे आहे का? असा सवालही नाना पटोले यांनी यावेळी विचारला आहे. एकनाथ शिंदे यांनी आणलेली गुंतवणूक कुठे गेली, किती रोजगार दिले? लाखो कोटींची जमीन उद्योगाच्या नावावर नाममात्र किमतीवर देत आहेत, राज्य कर्जबाजारी आहे. हे राज्य लुटू नका, राज्य सांभाळा, राज्य बरबाद करण्यासाठी नाही. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हे ही वाचा