एक्स्प्लोर

अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला जयंत  पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. पवार साहेबांनी आयात करणाऱ्या देशाला निर्यात करणारा देश बनवल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil : भारताच्या इतिहासात कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी जितकं काम केलं तितके कोणीची केले नाही. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी पवारांचे काम समजून घेतले असते तर त्यांना प्रश्न पडला नसता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला जयंत  पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. पवार साहेबांनी आयात करणाऱ्या देशाला निर्यात करणारा देश बनवला. पिकांना चांगला हमी भाव दिला, फळबागांना अनुदान दिले, हॉर्टीकल्चरची सुरू केली. त्यामुळे आज शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक घेत आहेत. कांदा, केळी अशा पिकांसाठी संशोधन केंद्र उभे केल्याचे जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्राच्या जनतेला पवार साहेबांवर प्रचंड विश्वास 

अमित शाह जर देशात फिरले तर त्यांना शेतकरी सांगेल की त्यांचा सातबारा पवार साहेबांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मदतीने कोरा केला. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर शेतकऱ्यांना त्यानंतर त्यांनी पॅकेजही दिले. एफ आर पी चे धोरण आणले त्याची कडक अंमलबजावणी केल्याचे जयंत पाटील म्हणाले. अशा अनेक गोष्टी मी सांगू शकेल, त्याला दिवस कमी पडेल. त्यामुळे वारंवार महाराष्ट्र येऊन अमित शाह यांनी पवार साहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस करु नये असे जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेला पवार साहेबांवर प्रचंड विश्वास आहे. तुम्ही प्रश्न उपस्थित केल्यानं जनतेचा त्यांच्यावरील विश्वास कमी होणार नाही असेही जयंत पाटील म्हणाले. 

 260 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन शरद पवारांच्या काळात झालं

कृषीमंत्री म्हणून शरद पवारांनी उत्तम काम केलं आहे. अन्न धान्य उत्पादनात शरद पवार कृषिमंत्री असताना 60 दशलक्ष टन वाढ झाली. एकेकाळी अन्न धान्याची आयात करणारा देश निर्यात करायला लागला. वाजपेयी काळात आधारभूत किमंती वाढलेल्या होत्या. 260 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन शरद पवारांच्या काळात झालं. 2013 मध्ये पहिल्यांदा भारताने 100 दशलक्ष टन तांदळाची निर्मिती केली. साऱ्या जगाने त्यावेळी वाहवाह केली. राष्ट्रीय फळबाग अभियान शरद पवारांनी सुरू केलं. राष्ट्रीय फलोत्पादन वर 8 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. याचा फायदा असा झाला की 60 लाख हेक्टर ओलिताखाली आले. त्याचा फायदा देशांतर्गत गरज भागवून देशाला 14 हजार कोटी रुपये परकीय चलन मिळाल्याचे जयंत पाटील म्हणाले. 80 लाख हेक्टर क्षेत्रावर 147 दशलक्ष टन भाज्या उत्पादन होतं होत्या. 14 हजार कोटी रुपये भाज्या निर्यात केल्यामुळं पैसे मिळतात. 

शेतकरी कर्जमाफी शरद पवारांनी केली

देशात शेतकरी कर्जमाफी शरद पवारांनी केली. 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी त्यांनी केली होती. शेतकरी सातबारा कोरा केला.दुष्काळात महाराष्ट्राला 2200 कोटी रुपये दिले. द्राक्ष बागायतदार उभे केले. एफआरपी सारखा कडक कायदा त्यांनी केला त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाल्याचे जयंत पाटील म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget