Chhagan Bhujbal NCP Adhiveshan: नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदा छगन भुजबळ अन् अजित पवार आमने-सामने; धनंजय मुंडेही राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित राहणार
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं 2 दिवसीय शिबिर शिर्डीमध्ये होणार आहे.
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं 2 दिवसीय शिबिर (NCP Adhiveshan Ajit Pawar Group) शिर्डीमधील पुष्पक रिसॉर्टमध्ये होणार आहे. आज (18 जानेवारी) या शिबिराला सुरुवात होणार आहे. या शिबिराला पक्षातील सर्व जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुकाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी हे या शिबिराला उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी झेंडावंदन झाल्यावर अधिवेशनाला प्रारंभ होईल. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं प्रास्ताविक भाषण होईल. दरम्यान मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही दिवासांपासून नाराज असलेले ज्येष्ठ आमदार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) शिबिरात उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाच्या शिबिरात छगन भुजबळ उपस्थिती लावणार की नाही?, याची चर्चा रंगली होती. प्रकृती अस्वस्थामुळे छगन भुजबळ शिबिराला उपस्थित राहणार नव्हते, असं सांगण्यात येत होते. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा विनंतीला मान देऊन भुजबळ शिबिराला हजेरी लावणार असल्याचं आता समोर आलं आहे. विशेष म्हणजे या शिबिरमध्ये छगन भुजबळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत. नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ आणि अजित पवार आमने येणार आहे. त्यामुळे शिबिरात नेमकं काय घडणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मंत्री धनंजय मुंडेही शिबिराला उपस्थित राहणार-
वाल्मिक कराड हे मागच्या पक्षाच्या गेल्या वर्षीच्या शिबिराला उपस्थित होते. पण आत्ता मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई झाल्यामुळे त्यांची उपस्थिती राहणार नाही. पण मंत्री धनंजय मुंडे शिबिराला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत छगन भुजबळ, तर 12 वाजेपर्यंत धनंजय मुंडे शिबिरात हजेरी लावणार आहेत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने विरोधकांनी लावून धरलीय. त्यामुळे आजच्या अधिवेशनात या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
छगन भुजबळ यांच्या स्वागतासाठी पक्षाच्यावतीने मोठे बॅनर-
डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळालं नाही आणि त्यामुळे ते नाराज होऊन नाशिकला निघून गेल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली नव्हती. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा संवाद देखील होऊ शकला नव्हता. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिवेशन शिर्डी येथे पार पडत आहे आणि या अधिवेशनाला छगन भुजबळ हजेरी लावणार आहेत. छगन भुजबळ यांच्या स्वागतासाठी पक्षाच्यावतीने मोठे बॅनर लावण्यात आले असून अजित पवार सुनील तटकरे प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ असे बॅनरवर मोठे फोटो देखील लावण्यात आलेले आहेत.