Nitesh Rane vs Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, टिल्ल्यांच्या नादी लागत नाही, आता नितेश राणेंचा जहरी वार
Nitesh Rane vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या टिप्पणीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे."देवाने मला दिलेल्या शरीरयष्टीवरुन भाष्य करुन अजित पवार यांची वैचारिक उंची कळली," असं राणे म्हणाले.
Nitesh Rane vs Ajit Pawar : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या टिप्पणीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) चांगलेच खवळले आहेत. "देवाने मला दिलेल्या शरीरयष्टीवरुन भाष्य करुन अजित पवार यांची वैचारिक उंची कळली. त्यांना औरंग्यावरची टीका सहन झाली नाही हेच यावरुन सिद्ध झालं," अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे. नितेश राणे यांनी याबाबत ट्वीट करुन अजित पवार यांनी केलेल्या टिप्पणीला उत्तर दिलं आहे.
नितेश राणे यांनी काय म्हटलं?
लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरुन भाष्य केले यावरुनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना 'औरंग्यावरची' टीका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही, असं नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही.@AjitPawarSpeaks
— nitesh rane (@NiteshNRane) January 5, 2023
टिल्ल्या लोकांनी सांगायचं कारण नाही : अजित पवार
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हेत, तर स्वराज्यरक्षकच आहेत, असं वक्तव्य अजित पवार यांनी विधानसभेत केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पडदा टाकला. एकीकडे आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत म्हणतानाच, दुसरीकडे शरद पवारांच्या भूमिकेशीही सहमत असल्याचे सांगितलं. अजित पवार यांना कालच्या पत्रकार परिषदेत भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. "नितेश राणे म्हणाले होते, शरद पवारसाहेब कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करत नाहीत, शिवाय ते आजपर्यंत कधीही रायगडावर गेले नाहीत" असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की, "टिल्ल्या लोकांनी असं काही सांगायचं कारण नाही. त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझे बाकीचे प्रवक्ते उत्तर देतील. असल्यांच्या नादी लागत नसतो मी."
धरणवीरांना धर्मवीर कसे समजणार? : नितेश राणे
त्याआधी नितेश राणे यांनी ट्वीट करत अजित पवार यांना डिवचलं होतं. 'धरणवीर'ना 'धर्मवीर' कसे समजणार ..आता धर्म रक्षणासाठी ..तलवार नको 'शाही पेन' ही चालेल..,"असे ट्वीट करत राणे यांनी नाव न घेता अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता.
“धरणवीर” ला “धर्मवीर” कसे समजणार ..
— nitesh rane (@NiteshNRane) December 31, 2022
आता धर्म रक्षणासाठी ..
तलवार नको “शाही पेन” ही चालेल..
हर हर महादेव !!!
VIDEO : Ajit Pawar Live : टिल्ल्या लोकांनी सांगायचं कारण नाही, तुमची उंची किती? नितेश राणेंना टोला
संबंधित बातमी