एक्स्प्लोर

Bharat Gogawale On Sunil Tatkare: सुनील तटकरेंनी आम्हाला पाडण्यासाठी सेटलमेंट केली; भरत गोगावलेंचा धक्कादायक आरोप

Bharat Gogawale On Sunil Tatkare: मी पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्यामुळे सुनील तटकरेंना ते नकोय, असं भरत गोगावले म्हणाले. 

Bharat Gogawale On Sunil Tatkare रायगड: रायगडमधील पालकमंत्रिपदाबाबत आम्ही आमच्या नेत्यांना परिस्थितीबाबत कल्पना दिली आहे. कदाचित आज किंवा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया मंत्री आणि शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांनी आमची नावे पालकमंत्रिपदासाठी दिली होती. आमचा वाद मुळात वेगळा कारणाने सुरू झाला. आम्ही युतीतील उमेदवारांनी सुनील तटकरे यांचं मनापासून काम केलं होत. एक इंच सुद्धा कामात चूक झाली नाही. मात्र सुनील तटकरेंनी आमच्यावर चुकीचा ठपका ठेवून काम केलं. मी पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्यामुळे सुनील तटकरेंना ते नकोय, असं भरत गोगावले म्हणाले. 

सुनील तटकरेंनी आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींशी सेटलमेंट केली- भरत गोगावले

सुनील तटकरे यांनी आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींशी सेटलमेंट केली आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना पाडण्यासाठी शेकापचे जयंत पाटील यांच्याशी हातमिळवणी केली. माझ्यासाठीसुध्दा सुनील तटकरेंनी विरोधकांशी हातमिळवणी केली होती, असा आरोप भरत गोगावले यांनी केला आहे. आमची त्यांच्या निवडणूकीत कोणती चूक केली असेल तर त्यांनी दाखवून द्यावी. सुनील तटकरे यांचं आज खरं स्वरूप पहायला मिळालं आणि म्हणूनच आमचा त्यांच्यावर राग आहे, असं भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं. तसेच अदिती तटकरे यांना निवडून आणण्यासाठी देखील आम्ही झोकून काम केलं.  आम्ही सगळं त्यांच्यासाठी करत असताना ते जर का असे वागत असतील तर कितपत योग्य आहे?, असा सवालही भरत गोगावले यांनी उपस्थित केला आहे.

रायगड पालकमंत्री पदावरून टीका करणाऱ्या थ्री इडीयटसला एकनाथ शिंदेंनी आवरावं- सूरज चव्हाण

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केली आहे. रायगड पालकमंत्री पदावरून टीका करणाऱ्या थ्री इडीयटसला तत्काळ एकनाथ शिंदे यांनी आवरावं ही माझी त्यांना विनंती आहे. जर त्यांचं म्हणणं आहे की, सुनील तटकरे यांनी महायुतीच काम केल नाही तर मग हा विषय आधीच निवडणुका संपल्यानंतर भरत गोगावले यांनी बोलायला हवं होतं. आता त्यांना कुठून बुद्धी सुचली. आता पालकमंत्री पदाचा विषय आला की काहीही आरोप करणार का? हे खपवून घेतलं जाणार नाही. पालकमंत्री हा विषय तिन्ही नेत्यांनी समन्वयाने घेतला होता. आज भरत गोगावले या विषयावर बोलत असतील तर ते महायुतीच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांचा निर्णयाला चॅलेंज करत आहेत, असं सूरज चव्हाण म्हणाले.

संबंधित बातमी:

Raigad : वाद भडकला अन् रायगडचं पालकमंत्रिपद पुन्हा अडकलं; तटकरे की गोगावले, पालकमंत्रिपदी कोण? की दोघांच्या भांडणात तिसऱ्याला लाभ? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
PM नरेंद्र मोदींच्या स्वागताची संधी, तेजस्विनी घोसाळकरांचा नमस्कार; म्हणाल्या, दहिसरच्या जनतेसाठी...
PM नरेंद्र मोदींच्या स्वागताची संधी, तेजस्विनी घोसाळकरांचा नमस्कार; म्हणाल्या, दहिसरच्या जनतेसाठी...
महापशुधन एक्स्पोसाठी 3 कोटींचा मंडप, स्वत:वरील गाण्यासाठी आनंद शिंदेंना कोट्यवधी दिले; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
महापशुधन एक्स्पोसाठी 3 कोटींचा मंडप, स्वत:वरील गाण्यासाठी आनंद शिंदेंना कोट्यवधी दिले; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Super-8 Schedule : भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2 मार्चला ईपीएफओच्या बोर्डाची महत्त्वाची बैठक, व्याज दरावर निर्णय होणार 
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2 मार्चला ईपीएफओच्या बोर्डाची महत्त्वाची बैठक, व्याज दरावर निर्णय होणार 
Share Market : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
धक्कादायक, जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
Embed widget