Amravati : भाजप आमदार प्रवीण तायडे विरोधात बच्चू कडूंची प्रहार आक्रमक; थेट आव्हान देत पोलिसांकडे तक्रार
Amravati News : अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल भाजपचे विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांनी केलेल्या अर्वाच्य वक्तव्यामुळे प्रहार संघटना आक्रमक झाली आहे.
अमरावती : अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याबद्दल भाजपचे विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांनी केलेल्या अर्वाच्य वक्तव्यामुळे प्रहार संघटना (Prahar Janshakti Party) आक्रमक झाली आहे. प्रहार संघटनेतर्फे आज अमरावती पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देऊन तक्रार करण्यात आली. तसेच आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंच्या नादाला न लागता पहिले प्रहारच्या कार्यकर्त्यांचा सामना करून दाखवावा, असे आव्हान देखील प्रहारचे जिल्हाध्यक्ष बल्लू जवंजाळ यांनी आमदार प्रवीण तायडे यांना दिले आहे. दरम्यान, प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या विरोधात नेमकी काय कारवाई केली जाते आणि या आव्हानाला ते कसे उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बहिरम येथे भाजप आमदाराचे फलक फाडले
अमरावतीच्या बहिरम येथे सध्या बहिरम बाबांची यात्रा सुरू आहे, या यात्रेत अचलपूरचे नवनिर्वाचित भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे शुभेच्छा फलक फाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आमदार प्रवीण तायडेंचे शुभेच्छा फलक फाडल्यामुळे भाजप पदाधिकारी आक्रमक होण्याची शक्यता आहे. अचलपूर मतदारसंघात प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंना पराभूत करत प्रवीण तायडे हे निवडून आलेले आहेत.
तरुणाचा मृतदेह आढळल्यानं भंडाऱ्यात खळबळ
भंडाऱ्याच्या जवाहरनगर पोलिस स्टेशन हद्दीतील जवाहरनगर ते नांदोरा या मार्गावर रस्त्यालगत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेनं भंडाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. अभय ढोके (23) रा. जवाहरनगर असं मृतकाचं नावं आहे. मृतक अभयच्या अंगावर त्याची स्पोर्ट्स बाईक पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णात पाठवला आहे. अभयच्या मृत्यूचं नेमकं काय कारण आहे? याचा शोध आता जवाहरनगर पोलीस घेत असून शवविच्छेदन अहवालानंतर ते स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या