एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: अजितदादा आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाला गेले, 40 वर्षात असं पाहिलं होतं का, त्यांना आमचा गुण लागलाय: देवेंद्र फडणवीस

Maharashtra Politics: महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचा दावा. अजित पवार यांच्या महायुतीमधी समावेशाबद्दल देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक भाष्य. अजित पवारांना घेऊन कोणतीही चूक झालेली नाही.

मुंबई: अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने कोणतीही चूक केलेली नाही. अजित पवार यांना सोबत घेणे ही काळाची गरज होती. राजकारणात काळाची गरज असताना हाती आलेली संधी सोडायची नसते. अजितदादांबाबत (Ajit Pawar) घेतलेली संधी सेटल व्हायला वेळ लागेल. पण एका वातावरण स्थिर झाले की ही संधी घेतल्याचा फायदा आम्हाला मिळेल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते शुक्रवारी 'टीव्ही ९ मराठी' कॉनक्लेच्या व्यासपीठावरुन बोलत होते.

यावेळी अजित पवार यांना सोबत घेण्याचा निर्णय चुकला का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. अजितदादांसोबत युती करुन आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची मतं भाजपला (BJP) ट्रान्सफर झाली नाहीत, ही खरी गोष्ट आहे. पण त्यावेळी अजित पवार यांचा पक्ष नवीन होता. त्यांचीच मतं सेटल होणे गरजेचे होते. त्यामुळे लोकसभेला (Loksabha Election 2024) त्यांना त्यांची मतं भाजपला ट्रान्सफर करता आली नाहीत. पण विधानसभा निवडणुकीत तसं घडणार नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अजितदादा सर्व आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाला गेले, त्यांना आमचे सगळे गुण लागतील: देवेंद्र फडणवीस

अजित पवार गुलाबी झाले पण ते भगवे झाले नाहीत, या राजकीय वर्तुळातील चर्चेबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अजित पवार त्यांच्या सगळ्या आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाला (Siddhivinayak) गेले होते. तुम्ही अजितदादांना 40 वर्षांपासून राजकारणात पाहताय. तु्म्ही अजितदादांना अशा गोष्टी करताना पाहिले होते का? ते आमच्यासोबत राहिले की त्यांना आमचे काही गुण लागणारच ना? तुम्ही काळजी करु नका. त्यांना हळूहळू आमचे सर्व गुण लागतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

महायुतीमध्ये चेहऱ्याचा वाद नाही; फडणवीसांचं वक्तव्य

महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन वाद आहे का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी म्हटले की, आमच्यात चेहऱ्यावरुन कोणताही वाद नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, त्याअर्थी  तेच सरकारचा प्रमुख चेहरा आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

आणखी वाचा

'शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही',मनोज जरांगेंवर टीका करु नका, आपले टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस; सुप्रिया सुळेंचे प्रवक्त्यांना आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर, ठाकरे गटाचा पाठिंबा, सुप्रिया सुळेंकडून अमित शाहांचं कौतुक; नेमकं काय घडलं?
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर, ठाकरे गटाचा पाठिंबा, सुप्रिया सुळेंकडून अमित शाहांचं कौतुक; नेमकं काय घडलं?
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 03 April 2025Chandrakant Khaire Full PC : उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाद मिटला पण दानवे माझं ऐकत नाही,खैरेचा नाराजीABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 03 April 2025Special Report On Dhananjay Munde : धनुभाऊ अजितदादांसाठी आजारी पण.. लेकीच्या फॅशनशोमध्ये हजेरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर, ठाकरे गटाचा पाठिंबा, सुप्रिया सुळेंकडून अमित शाहांचं कौतुक; नेमकं काय घडलं?
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर, ठाकरे गटाचा पाठिंबा, सुप्रिया सुळेंकडून अमित शाहांचं कौतुक; नेमकं काय घडलं?
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आरजे महावशची बॉयफ्रेंडबाबतची पोस्ट अन् युजवेंद्रचं फक्त 15 सेकंदांतच लाईक; नेटकऱ्यांनी विचारलं, तूच आमची पुढची वहिनी?
आरजे महावशची बॉयफ्रेंडबाबतची पोस्ट अन् युजवेंद्रचं फक्त 15 सेकंदांतच लाईक; नेटकऱ्यांनी विचारलं, तूच आमची पुढची वहिनी?
Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
Embed widget