Jitendra Awhad: अजितदादांनी आम्हाला ठरवून भाजपमध्ये पाठवलं, नंतर स्वत:ही आले; मल्हार पाटलांच्या वक्तव्याने गुपित फुटलं?
Maharashtra Politics: अजितदादांनी आधी आम्हाला ठरवून भाजपमध्ये पाठवलं नंतर ते भाजपसोबत आले. आम्ही अजित पवारांच्या सहमतीनेच भाजपमध्ये गेलो होतो. मल्हार पाटील यांचं वक्तव्य. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अजित पवार यांच्यावर टीका
ठाणे: भाजपचे तुळजापूर मतदारसंघातील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी केलेले एक वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड गाजत आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरुन शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवारांनी आधीपासूनच राष्ट्रावादी काँग्रेस फोडण्याचा डाव आखला होता, असा आरोप केला आहे. मल्हार पाटील (Malhar Patil) यांनी रविवारी एका सभेत म्हटले की, पंतप्रधान मोदींवर (PM Modi) विश्वास ठेऊन आम्ही अजितदादांच्या सहमतीने 2019 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. याच वक्तव्याचा धागा पकडत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर कट रचून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्याचा आरोप केला. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन अजित पवार यांना लक्ष्य केले.
जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
आज मल्हार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेले विधान हे सत्याला अनुसरूनच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे कटकारस्थान 2014 पासूनच सुरू झाले होते. पडद्यामागून हालचाली सुरू होत्या. त्याचाच एक भाग म्हणून भाजपसोबत गेलेले नेते नित्यनियमाने आदरणीय शरद पवार साहेबांच्या कानात 'भाजपसोबत जाऊया', असे सांगत होते. अजित पवार यांच्यासोबत जे चार नेते गेले आहेत. ते या कटाचे सूत्रधार होते. याच चौघांच्या मदतीने अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील महत्वाचे नेते भाजपला दिले अन् निवडूनही आणले. हे सर्व जेव्हा मी बोलायचो, तेव्हा, माझ्याकडे काय पुरावा आहे, अशी विचारणा व्हायची. पण, आज घरातल्याच लोकांनी पुरावे दिले आहेत.
आदरणीय शरद पवार साहेब यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा कट अनेकवर्षांपासून सुरू होता. पण, हा सुरूंग घरातच लावला जाईल, असे वाटले नव्हते. हा सुरूंग कोणी लावला हे आता सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छपणे उघडकीस आले आहे.
साहेबांना राजकीयदृष्ट्या संपविणे हे अजित पवार यांच्या मनातच होते. त्यामुळेच ते साहेबांना अडचणीत आणण्याची कोणतीही संधी सोडत नव्हते. २०१९ साली पहाटेचा शपथविधी करून त्यांनी साहेबांना अडचणीत आणले होते. २०२३ साली साहेबांनी रक्ताचं पाणी करून जन्म दिलेला आणि वाढविलेला पक्ष फोडून पुन्हा साहेबांना अडचणीत आणले. साहेबांनी ज्यांना हाताला धरून चालायला शिकवले. त्यांनीच पायात पाय घालून पाडण्याचे जे तंत्र वापरले आहे. त्यासाठी खेद व खंत हे दोन्ही शब्द कमी पडतील. आता याबाबत योग्य तो खुलासा करावा. अर्थात, तो खुलासा करताच येणार नाही. कारण, सत्य हे कटू नव्हे तर "कडू" आणि पचवायलाही अवघड असते.
आज मल्हार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेले विधान हे सत्याला अनुसरूनच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे कटकारस्थान 2014 पासूनच सुरू झाले होते. पडद्यामागून हालचाली सुरू होत्या. त्याचाच एक भाग म्हणून भाजपसोबत गेलेले नेते नित्यनियमाने आदरणीय शरद पवार साहेबांच्या कानात 'भाजपसोबत… pic.twitter.com/IOOwG24Uvg
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 14, 2024
आणखी वाचा
शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी हा कट : जितेंद्र आव्हाड