Aditya Thackeray : पेपर फोडणाऱ्याला १० वर्षाची शिक्षा, जो पेपर फोडेल, त्याला सरकार फोडेल; आदित्य ठाकरेंचा महाराष्ट्राला शब्द
Aditya Thackeray, लालबाग : "20 तारखेला अधिवेशन घेत आहात. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवत आहात तर नोकरी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षामध्ये पेपर फुटीवर सुद्धा कडक कायदा आणा. पेपर फुटी झाली तर पेपर फोडणाऱ्याला १० वर्षाची शिक्षा , असा कडक कायदा करा.
Aditya Thackeray, लालबाग : "20 तारखेला अधिवेशन घेत आहात. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवत आहात तर नोकरी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षामध्ये पेपर फुटीवर सुद्धा कडक कायदा आणा. पेपर फुटी झाली तर पेपर फोडणाऱ्याला १० वर्षाची शिक्षा , असा कडक कायदा करा. मी शब्ब्द देतो, की आमचं सरकार आलं तर पेपरफुटीवर कडक कायदा आणू. जो पेपर फोडेल त्याला आमच सरकार त्याला फोडेल", असा शब्द ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिला. मुंबईतील लालबाग येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
दिल्ली समोर लोटांगण घालण्याचे काम राज्य सरकार करतय
आदित्य ठाकरे म्हणाले, संसदेचे अधिवेशन सुरु होते तेव्हा कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी जीएसटीचे पैसे राज्याला मिळावे यासाठी आंदोलन केलंय. तिकडे मणिपूर जळत आहे, सगळीकडे आंदोलन होत आहेत. आपल्या राज्य सरकारने कधी काही पॅकेज केंद्राकडे मागितलं? राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुंबईसाठी केंद्राकडे पॅकेज मागितलं? दिल्ली समोर लोटांगण घालण्याचे काम राज्य सरकार करत आहे.
हे आता अवकाळी सरकार आलाय
भूतकाळवरून आपल्याला लढवलं जात. 50 वर्ष पूर्वी काय झालं यावर हे लढवत आहेत. निर्मला सीतारमन म्हणाल्या, 5 जातीकडे लक्ष द्यावं लागणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी मदत हवी आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये. मागच्या 5 वर्षात 5 सरकार तुम्ही पाहिले. हे आता अवकाळी सरकार आलाय. कोरोनाकाळात अर्थचक्र पुन्हा सुरु करण्याचा काम आपल्या सरकार असताना सुरु केलं. साडे ६ लाख कोटीची गुंतवणूक आपण आपल्या राज्यासाठी आणली जेव्हा आपलं सरकार होतं. सध्या तरुणांना रोजगार मिळत नाहीये त्यांचा स्वप्न हे सरकार चिरडत आहे, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
डाग अच्छे है! वॉशिंग पावडर भाजपा
आता राहुल गांधी यांना मी सांगेल, तुम्ही भाजपमध्ये जा पंतप्रधान व्हाल कारण भाजपमध्ये सगळे काँग्रेसचे नेते आहेत. आता अच्छे दिन ही भाजपची टॅग लाइन राहिली नाही...डाग अच्छे है! वॉशिंग पावडर भाजपा, असं सर्वकाही सुरु आहे, असेही आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यावेळी बोलताना म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या