Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? आज होणार मोठा निर्णय, रोहित शर्माचं टेन्शन मिटणार?
Jasprit Bumrah : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळणार की नाही याचा निर्णय आज होणार आहे.

Jasprit Bumrah Decision For Champions Trophy 2025 नवी दिल्ली: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने दुबईत होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघामध्ये जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात जसप्रीत बुमराहला स्थान देण्यात आलं आहे. मात्र, तो स्पर्धेत सहभागी होईल की नाही याबाबत स्पष्टता आलेली नाही. दुखापतीमुळं जसप्रीत बुमराह इंग्लंड विरुद्ध खेळल्याजात असलेल्या वनडे मालिकेत खेळलेला नाही. 11 फेब्रुवारीला म्हणजेच जसप्रीत बुमराहच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी होणार की नाही हे ठरणार आहे.
आज (11 फेब्रुवारी) सर्व संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांच्या संघातील सदस्यांची अंतिम यादी सादर करायची आहे. त्यानुसार बीसीसीआय आजपर्यंत जसप्रीत बुमरहाच्या फिटनेसच्या अपडेट बाबत वाट पाहत आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार बुमराहनं बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये कमरेचं स्कॅनिंग केलं. बुरमाहवर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वैद्यकीय टीम व्यवस्थापनाचे सदस्य आणि निवडकर्त्यांशी बैठक करेल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतानं पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारतानं पाच कसोटी सामने खेळले होती. यातील सिडनी कसोटीत जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. बुमराह मॅचमधून बाहेर निघून गेला होता. तो दुसऱ्या डावातही गोलंदाजीसाठी आला नव्हता.
चॅम्पियन्स ट्रॉफीत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बुमराहच्या फिटनेसवर अखेरची अपडेट काय येते याकडेही सर्वांचं लक्ष लगालं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतासाठी जसप्रीत बुमराह महत्त्वाचा गोलंदाज ठरणार आहे. मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा हे वेगवान गोलंदाज आहेत. इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यात अर्शदीप सिंगला स्थान मिळालेलं नाही. तर, मोहम्मद शमी आणि हर्षित राणाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल (उपकॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल,रिषभ पंत, रवींद्र जडेजा.
इतर बातम्या :





















