एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुखांना मारल्यानंतर कराड गँग स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळत सुटली; CCTV फुटेज आलं समोर

Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 2 महिने झाले आहेत.

Santosh Deshmukh Murder Case बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Murder Case) करून पळणाऱ्या आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हत्येनंतर संध्याकाळी धाराशिवच्या वाशीमध्ये गाडी सोडून 6 आरोपी पळाल्याचे या सीसीटीव्हीद्वारे दिसत आहे.

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 2 महिने झाले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलीस, सीआयडी पथकं तपास करतायेत. मात्र हत्येतील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) अजूनही फरार आहे. संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली. मात्र देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. याचदरम्यान सदर प्रकणातीला आरोपींचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर  आले आहे. 

आरोपींचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर-

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हत्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणाहून पळून जातानाचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे. धाराशिवमधील वाशी शहरातील पारा चौक या ठिकाणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि त्याचे साथीदार पोहोचले आणि त्या ठिकाणाहून स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळून जाताना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, त्याच दिवशीचं म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्यानंतरच हे फुटेज आहे.

बीड जिल्ह्यातील 310 शस्त्र प्रमाणे रद्द-

बीड जिल्ह्यामध्ये परवानाधारक शस्त्र परवान्यांपैकी आतापर्यंत 310 जणांचे शस्त्र परवाने हे रद्द करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 1281 इतके शस्त्र प्रमाणे आहेत मात्र ज्या व्यक्ती वरती यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत त्या व्यक्तीकडील पिस्तूल परवाना रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता आणि त्याची कारवाई मागच्या एक महिन्यापासून सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण परवानाधारक पिस्तूल चा वापर करणाऱ्या व्यक्तींच्या 25% परवाने हे रद्द झाले आहेत.

आपण तपास यंत्रणेवर अप्रत्यक्ष प्रश्न चिन्ह निर्माण करतोय- ज्योती मेटे

शिवसंग्रामच्या अध्यक्षा जोती मेटे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. बीडमधील संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे अमानवी कृत्य असून, सर्व दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जेव्हा राजीनाम्याचा प्रश्न उपस्थित केला जातो, तेव्हा माझं या बद्दल वेगळं मत आहे, ज्या तपास यंत्रणा आहेत, त्या तपास यंत्रणांनी निःपक्षपाती पणेच काम करणे अपेक्षित आहे. असं वक्तव्य शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी केलं. आपण जेव्हा असं म्हणतो की, एखाद्याने राजीनामा द्यावा जेणेकरून या यंत्रणा चांगल काम करू शकतील. त्यामुळे आपण तपास यंत्रणेवर अप्रत्यक्ष प्रश्न चिन्ह निर्माण करतोय, असं ज्योती मेटे म्हणाल्या. तसेच राजीनामा हा पक्षाच्या नेतृत्वाचा आणि मुख्यमंत्र्यांचा विषय आहे, असंही ज्योती मेटे यांनी सांगितले. 

संबंधित बातमी:

Tanaji Sawant Son Rushiraj Sawant: ऋषीराज सावंतसोबत खाजगी विमानानं पुण्याहून बँकॉकला जाणारे ते दोघं कोण?; नावं आली समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
MP Salary Appraisal: खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC Nashik : देवेंद्र फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं,  राऊतांचा मोठा खुलासाBeed Crime Satish Bhosale: पोलिसांकडून खोक्या भाईला रॉयल ट्रिटमेंट, बिर्याणी अन् मोबाईलमध्ये अनलिमिटेड टॉकटाईमTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 25 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
MP Salary Appraisal: खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
Eknath Shinde on Kunal Kamra : कुणाल कामराच्या गाण्यावर शिवसैनिकांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुपारी घेऊन...
कुणाल कामराच्या गाण्यावर शिवसैनिकांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुपारी घेऊन...
Sanjay Raut: आधी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतली, मग म्हणाले बहुमत चंचल असतं, कधीही.... संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
आधी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतली, मग म्हणाले बहुमत चंचल असतं, कधीही.... संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut : फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं, पण...; राऊतांनी सगळंच सांगितलं!
फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं, पण...; राऊतांनी सगळंच सांगितलं!
Embed widget