एक्स्प्लोर
ITR भरणाऱ्यांची संख्या वाढली, गेल्या पाच वर्षात प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या 70 लाखांनी घटूनही सरकारच्या कमाईत जोरदार वाढ
Income Tax Return : आयटीआर भरणाऱ्यांची संख्या गेल्या पाच वर्षांमध्ये वाढली असली तरी कर भरणाऱ्यांची संख्या मात्र 33 टक्क्यांनी घटली आहे.

आयटीआर भरणाऱ्यांची संख्या वाढली
1/6

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आयटीआर भरणाऱ्यांची संख्या 8 कोटींच्या वर गेली आहे. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये कर भरणाऱ्यांची संख्या 70 लाखांनी घटली आहे. म्हणजेच आयचीआर भरणाऱ्यांची संख्य वाढली असली तरी कर भरणाऱ्यांच्या संख्येत 2019-20 च्या तुलनेत 2024-25 मध्ये 33 टक्क्यांनी घटली आहे. तरी देखील सरकारनं यातून चांगली कमाई केली आहे.
2/6

लोकसभेत वित्त मंत्रालयाला प्रश्नोत्तराच्या तासात गेल्या पाच वर्षात आयटीआर भरणाऱ्यांची संख्या किती होती, असं विचारलं होतं. याशिवाय यापैकी किती जण कर भरतात हा प्रश्न विचारण्यात आला होता.
3/6

अर्थमंत्रालयानं त्यांच्या उत्तरात दिलेल्या आकडेवारीनुसार 2019-20 मध्ये आयटीआर भरणाऱ्यांची संख्या 6,47,88,494 इतकी नव्हती. त्यावेळी 2,90,36,23 लोकांनी आयटीआर भरला मात्र कर भरला नाही म्हणजेच त्यावेळी 3,57,52,260 लोकांनी कर भरला.2024-25 मध्ये आयटीआर भरणाऱ्यांची संख्या 8 कोटींवर गेली आहे.
4/6

लोकसभेत दिल्या गेलेल्या उत्तरानुसार 8,39,73,416 लोकांनी आयटीआर भरला होता. मात्र, कर भरणाऱ्यांची संख्या कमी झाली. 2024-25 मध्ये 5,57,95,351 लोकांनी आटीआर भरला मात्र कर दिला नाही. प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या 2 कोटी 81 लाख 78 हजार 025 इतकी होती.
5/6

केंद्र सरकारनं प्राप्तिकराच्या रचनेत केलेल्या बदलांमुळं हा परिणाम झाला आहे. केंद्रानं नवी कररचना अस्तित्वात आणली. याशिवाय आता निर्मला सीतारामन यांनी 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत दिलीय, त्यामुळं करदात्यांची संख्या 1 कोटींपेक्षा कमी होईल.
6/6

140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात केवळ 2 टक्के लोक खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष कराच्या रुपात प्राप्तिकर सरकारला भरतील. कर तज्ज्ञ गोपाल केडिया यांनी कर भरणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी सरकारला प्राप्तिकरातून मिळणारनं उत्पन्न वाढलंय असं म्हटलं. या आर्थिक वर्षात सरकारला 20 लाख कोटी प्राप्तिकरातून मिळालेत अजूनही 2 ते 3 लाख कोटी मिळतील, असं ते म्हणाले. आयकराच्या माध्यमातून होणारी कमाई 24 लाखकोटींपर्यंत जाऊ शकते.
Published at : 11 Feb 2025 09:25 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion