(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani News : परभणीतील काट्याच्या लढतीत महाविकास आघाडीचा 3 तर भाजपचा 2 ठिकाणी विजय
Parbhani : जिल्ह्यात महाविकास आघाडीला 4 ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करता आले असून, दोन ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
APMC Election 2023 Result : सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी बाजार समितीच्या निवडणुकीचा (APMC Election) निकाल आज हाती आला आहे. दरम्यान परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) दहा पैकी सात बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान होऊन, आज मतमोजणी झाली. ज्यात भाजपने महाविकास आघाडीला जिल्ह्यात चांगलीच टक्कर दिल्याचं समोर आलंय. जिल्ह्यात महाविकास आघाडीला 4 ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करता आले असून, दोन ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर एका ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे या वेळच्या निवडणुकीमध्ये भाजपने दिलेल्या काट्याच्या टक्करमूळे भाजपच्या ताब्यात दोन बाजार समित्यां तर आल्याच, शिवाय त्यांच्या जागाही वाढल्या आहेत.
परभणी बाजार समिती: जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाची बाजार समिती म्हणलं तर परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती समजली जाते. या बाजार समितीची वार्षिक उलाढाल ही जवळपास 200 ते 250 कोटींची आहे. या ठिकाणी मागच्या वेळेला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व होते. यंदाही या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला बाजूला ठेवून, ही निवडणूक एकत्रित रित्या लढवली. या निवडणुकीत प्रथमच भाजपने या दोन्ही पक्षाच्या पॅनलला चांगलीच लढत दिली. भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन ही निवडणूक लढली होती. ज्यामध्ये पहिल्याच प्रयत्नात भाजपला चार जागा मिळवण्यात यश आले आहे. या निवडणुकीत अनेक मतं बाद झाल्यामुळे भाजपला काही जागांवर फटका बसलाय. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतील पक्षीय बलाबल पाहिले तर 18 पैकी महाविकास आघाडीला 12 , भाजपला 4 आणि अपक्ष 2 जागांवर विजयी झाले आहेत.
बोरी, जिंतूर आणि सेलू बाजार समिती: दुसरी अटीतटीची लढत बोरी, जिंतूर आणि सेलूमध्ये पाहायला मिळाली. बोरी आणि जिंतूर, सेलू या तीनही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे तर, भाजपच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्या पॅनलमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली. ज्यामध्ये भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी बोरी आणि जिंतूर बाजार समितीमध्ये आपले निर्वाद वर्चस्व प्रस्थापित केले. या ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांना पराभव स्वीकारू लागला. तर तिकडे सेलूमध्ये भांबळे यांनी भाजपला पराभूत केले आहे. निकालाचे आकडे पाहिले तर जिंतुर बाजार समितीमध्ये भाजपला 14 आणि राष्ट्रवादीला 4 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर बोरीमध्ये भाजप 12 आणि राष्ट्रवादीचं 6 ठिकाणी विजय झाला. सोबतच सेलुमध्ये भाजप 6 तर राष्ट्रवादीला 12 जागांवर विजय मिळाला आहे. तर दोन ठिकाणी अपक्ष निवडणून आले आहे आहेत.
गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार: समितीमध्ये तीन तगडे पॅनल एकमेकांच्या विरोधामध्ये होते. ज्यामध्ये महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ मधुसूदन केंद्रे, माजी आमदार सिताराम घनदाट, काँग्रेसचे नेते बाळकाका चौधरी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भगवान सानप यांचा एक पॅनल होता. शिवाय रासपचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम यांचा एक पॅनल होतं. तसेच तिसरा पॅनल हा भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष मुरकुटे यांचा होता. ज्यात भाजपमधील एक गट, रिपाई आठवले गट, मनसे, शिवसेना एकनाथ शिंदे गट अशा पक्षांचा मिळून एक पॅनल उभा करण्यात आला होता. या तीनही पॅनलमध्ये झालेल्या लढतीत महाविकास आघाडीच्या पॅनलने सरशी करत 18 पैकी 10 जागा जिंकल्या आहे. तर विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पॅनलने 8 जागा जिंकल्या आहे. भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य संतोष मुरकुटे यांच्या पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही. विशेष म्हणजे संतोष मुरकुटे यांचे बंधू दीपक मुरकुटे व वडील त्र्यंबक मुरकुटे यांचाही पराभव या निवडणुकीत झाला आहे.
ताडकळस कृषी उत्पन्न बाजार: समितीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षाचे वेगवेगळे पॅनल उभे होते. ज्यामध्ये भाजपने सर्वाधिक नऊ जागा मिळवले आहेत. त्या पाठोपाठ काँग्रेसने 6 आणि राष्ट्रवादीने 3 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी सभापती नेमका कोणाचा होणार? , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण तीनही पॅनल एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत.
पूर्णा कृषी उत्पन्न बाजार: समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी एक पॅनल उभा केला होता. त्यांच्या विरोधात भाजप, रासप आमदार रत्नाकर गुट्टे, व शिवसेना एकनाथ शिंदे गट अशा युतीचा पॅनल होता. या दोन्ही पॅनलमध्ये सरळ लढत झाली. ज्यामध्ये महाविकास आघाडीने 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवला आहे. तर रासप, एकनाथ शिंदे शिवसेना व भाजप युतीला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nashik APMC Election : लासलगाव बाजार समितीत पती-पत्नीचा विजयी गुलाल, पत्नीला 412 तर पतीला 303 मते