एक्स्प्लोर

महापालिकेनं अनधिकृत घोषित केलेल्या हॉटेलविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली; मनसेच्या राजू पाटलांना दणका

प्रशासनाने घाई गडबडीत पुलाची ही मार्गिका खुली केल्याने आजही हा पूल चर्चेचा विषय ठरला आहे. ही एक मार्गिका खुली करुन वाहतूक कोंडी दूर होणार नाही.

ठाणे : कल्याणमधील शीळ रस्त्यावर पलावा पुलाच्या बाजूला असलेले महालक्ष्मी हॉटेल केडीएमसीने अनधिकृत असल्याचे घोषित केले होते. या संदर्भात मनसे नेते राजू पाटील (Raju Patil) यांनी दाखल केलेली जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. ही याचिका का फेटाळली गेली आहे? अजून याचा तपशील येणे बाकी आहे. तपशील आल्यानंतर आम्ही योग्य ती पुढची कारवाई करू, असे मनसेचे (MNS) पदाधिकारी हर्षद पाटील यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण शीळ रस्त्यावरील पलावा जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पलावा पूलाचे काम प्रस्तावित करण्यात आले. एमएसआरडीसीकडून हे काम मंजूर केले गेले. या पूलाच्या कामासाठी कंत्राटदार नेमला गेला. हा पूल दोन मार्गिकेचा आहे. या पूलाच्या कामाच्या दर्जाबाबत आणि दिरंगाई बाबत मनसे नेते राजू पाटील यांनी अनेकदा प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सत्ताधारी पक्षाला टिकेचे लक्ष्य केले होते. या पूलाचे काम मार्गी लागत नसल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती. अखेरीस शीळहून कल्याणच्या दिशेने जाणारी पूलाची एक मार्गिका खुली करण्यात आली. तिचे लोकार्पण करण्यात आले. त्यावरुनही सत्ताधारी पक्षाने टिका करत लक्ष केले.

प्रशासनाने घाई गडबडीत पुलाची ही मार्गिका खुली केल्याने आजही हा पूल चर्चेचा विषय ठरला आहे. ही एक मार्गिका खुली करुन वाहतूक कोंडी दूर होणार नाही. त्यासाठी कल्याणहून शीळच्या दिशेने जाणाऱ्या पुलाच्या मार्गिकेचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याकडे, मनसेने नेते राजू पाटील यांनी लक्ष वेधले. या दुसऱ्या मार्गिकेच्या कामात आड येणारे महालक्ष्मी कृपा हॉटेलवर कारवाई केली जात नाही. त्यासाठी अलायमेंट बदलण्यात आल्याचा आरोपही मनसे नेते पाटील यांनी केला होता. या हॉटेलला महापालिकेने बेकायदा ठरविले होते. तरी देखील त्या विरोधात कारवाई केली जात नाही. अखेर राजू पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन कारवाईची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

यासंदर्भात हॉटेल मालक दीपा पाटील यांनी सांगितले की, मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी याचिका दाखल केलेली होती. जे महालक्ष्मी हॉटेल आहे. त्यामुळे विकास कामाला अडथळा येतात. या वास्तूला 35 वर्षे झाले आहे. त्या रस्त्यासाठी आमची जमीन गेली. आम्ही विकास कामाला अडथळा आणला नाही. हे लोक सांगतात हॉटेल अनधिकृत आहेत, आम्हाला त्रास देतात. 2022 लाही केस केली होती ती केस फेटाळली आहे, आजही ती केस फेटाळली. लालचंद पाटील यांनी सांगितले की, राजू पाटील यांनी याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेच्या विरोधात निकाल आला आहे. निकाल आमच्या बाजूने लागला आहे. कल्याण शीळ रस्त्याला आम्ही 19 गुंठे जागा दिलेली आहे. तरी पण हॉटेलवर लक्ष ठेवून हे बेकायदेशीर हॉटेल असल्याचे याचिकेत म्हटले होते. हायकोर्टाचा निकाल आमचा बाजूने लागला आहे.

हायकोर्टाची ऑर्डर मिळाल्यावर पुढील कारवाई करू

मनसेचे पदाधिकारी हर्षद पाटील यांनी सांगितले की, 2020 साली केडीएमसीने बेकायदा बांधकाम आणि लक्ष्मी हॉटेल अनधिकृत आहे. त्यापूर्वी देखील मनसे माजी आमदार राजू पाटील हे केडीएमसी सोबत पत्र व्यवहार करीत होते. त्या विरोधात कारवाई करावी. ज्यांची जागा या रस्त्यात गेलेली आहे. त्यांना योग्य तो मोबदला देऊन कारवाई करण्यात यावी. केडीएमसीकडून कारवाई करण्यात येत नव्हती. त्यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. केडीएमसीने कारवाई करावी असे आदेश न्यायालयाने केडीएमसीला द्यावेत अशी, आमची मागणी होती. हायकोर्टाने याचिका फेटाळली याची ऑर्डर आम्हाला मिळालेली नाही, ऑर्डर मिळताच योग्य ती पुढील कारवाई करु, असे पाटील यांनी म्हटले.

हेही वाचा

गोगावले शेठ, आमच्या तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत; बार्शीत शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा, गाडीलाच आडवे

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget